आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग्र्याला जाण्यापूर्वी औरंगाबादेत थांबले होते शिवाजी महाराज; पाहा दूर्मिळ छायाचित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/मुंबई- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड महाराष्‍ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची 388 वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. शिवाजी महाराजांनी 17 ऑगस्ट 1666 रोजी आग्र्यातून स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेला 351 वर्षे पूर्ण झाले. 

 

औरंगजेबाच्या दरबारात  शिवाजी महाराजांना कैद करण्यात आले होते. ते चार महिने मुघलांच्या नजर कैदेत होते. महाराजांनी फळांच्या पेटाऱ्यातून मुघल सैनिकांच्या हातावर तुरी देऊन महाराष्ट्र गाठले होते. याविशेष म्हणजे आग्र्याला जाण्यापूर्वी ते औरंगाबादेत थांबले होते.

 

राजपूत पत्रांवरुन 18 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराज बादशहा औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर आले. आलमगीर नामामध्ये शिवाजी महाराजांच्या सुटकेची तारीख 19 ऑगस्ट देण्यात आली आहे. त्यामागे कारण असे, की शिवाजी महाराज दिसेनासे झाल्याने मोगलांनी दिवसभर शोध घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आग्र्यातून बाहेर पडल्याचे जाहीर केले. शिवाजी महाराज आग्र्यात असताना राजपूतांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. या तारखेमुळे शिवाजी महाराजांच्या सुटकेची नेमकी कल्पना राजपुतांना होती, असेही समोर येते.

 

महाराजांची बरीचशी चित्रे विदेशात..
छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चित्रकारांनी काढलेली देखणी चित्रे आजही उपलब्ध आहेत. त्‍यापैकी बरीचशी चित्रे ही विदेशात आहेत. महाराजांच्‍या काही चित्रांवर तारखांचा उल्‍लेख नाही. मात्र, संग्रह करणा-याने केलेल्‍या लिखाणाच्‍या आधारावर या चित्रांचा काळ ठरवतो येतो. त्‍या अनुषंगाने divyamarathi.comया संग्रहातून आपल्‍याला महाराजांची विविध चित्रे दाखवणार आहे.

 

- 1672 च्या दरम्‍यान मनुचीने भारतातील 56 राजे-बादशाहांची चित्रे तयार केली.
- ही चित्रे त्‍यांनी मीर महम्मद कडून तयार केली होती.
- या संग्रहात एक चित्र शिवाजी महाराज यांचेही होते.
- मनुचीने घेतलेले चित्र सध्‍या पॅरीसमध्‍ये आहे.
- शिवाजी महाराज यांची विविध चित्रे विदेशात आहेत.
- राजस्‍थानमध्‍ये राजपुती शैलीत काढलेले चित्र, टाटा कलेक्शनमधील, फ्रांसच्या राष्ट्रीय
ग्रंथालयातील व बर्लिन स्टेट लायब्ररीतील चित्रे प्रसिद्ध आहेत.

 

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, शिवरायांची अत्‍यंत दुर्मिळ अशी चित्रे...

बातम्या आणखी आहेत...