Home | Maharashtra | Pune | Software Engineer Suicide in Pune

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरने लावला गळफास, दुसर्‍या घटनेत नौकरीच्या शोधात आलेल्या तरुणाची आत्महत्या

प्रतिनिधी | Update - Aug 11, 2018, 02:19 PM IST

पिंपरी-चिंचवड शहरात 24 तासांत आत्महत्येच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत संगणक अभियंत्याने आत्महत्या केली

 • Software Engineer Suicide in Pune

  पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात 24 तासांत आत्महत्येच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत संगणक अभियंत्याने आत्महत्या केली असून दुसऱ्या घटनेत नौकरीच्या शोधात आलेल्या युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास चिंचवडच्या बिजली नगर येथे घडली. राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. अद्याप आत्महत्याचे कारण समजले नाही.

  अभिजित रामदास मुळे (वय-38, रा.गिरिराज सोसायटी, बिजली नगर, चिंचवड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिस अधिक तपास करत आहेत.

  मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित रामदासमुळे या इसमाने राहत्या घरी साडेदहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी घरात कोणी नव्हते. अभिजित हे टीसीएस कंपनीत संगणक अभियंता होते. अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे. काही वर्षांपूर्वीच मयत अभिजितचा विवाह झाला होता. घरात छोटा भाऊ आणि पत्नीसह ते चिंचवड येथे राहात होते. मात्र आज सकाळी घरी कोणी नसताना अभिजितने गळफास घेऊन आत्महत्या केली. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. अधिक तपास चिंचवड पोलिस करत आहेत.

  दुसऱ्या घटनेत राजेश्वर दिनकर पाटील या युवकाने भोसरी परिसरात झाडाला गळफास पावत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना काल गुरुवारी घडली असून आज सकलाई इघडकीस आली आहे. भोसरी पोलिस घटनेचा तपास करीत आहे.

  राजेश्वर दिनकर पाटील हा नौकरीच्या शोधात पुण्यातील भोसरी परिसरात आपल्या नातेवाईकांकडे आला होता. गावाकडे शिक्षकने आणि नौकरी व्यवस्थित मिळत नसल्याने शहरात आपले स्वप्न पूर्ण करम्यासाठी आला होता. मात्र शहरात आल्यानंतर ही त्याला नौकरी मिळत नसल्याने राजेश्वर गेल्या काही दिवसंपासून निराश होता. गुरुवारी राजेश्वरने भोसरी परिसरात एका झाडाला गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. पुढील तपास भोसरी पोलिस करीत आहेत.

Trending