आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पावसामुळे रेल्वेगाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी SPECIAL FOOD TRAIN धावणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईसह उपनगरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिंदमाता, कुलाबा, माटुंगा, दादर, सांताक्रूज आणि सायन परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. नालासोपारा रेल्वे स्टेशनवरील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने सलग दुसर्‍या दिवशी पश्चिम रेल्वे लाइनवर लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नालासोपारा स्टेशनला नदीचे रुप प्राप्त झाले आहे. शताब्दी एक्स्प्रेस स्टेशनवर अडकून पडली आहे. याशिवाय अनेक गाड्या रखडल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

 

'स्पेशल फूट ट्रेन' धावणार

पावसामुळे रेल्वेगाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने 'स्पेशल फूड ट्रेन' पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 2000 फूड पॅकेट्‍स घेऊन ही ट्रेन मुंबई सेंट्रलहून नायगायपर्यंत धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारीने दिली आहे. प्रवाशांना जेवण आणि पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 

रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी उपनगरीय रेल्वे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. जवळपास 90 लोकल ट्रेन रद्द करण्‍यात आला आहेत. इंद्रायणी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर रद्द करण्‍यात आल्या असून अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. बहुतांश गाड्या 10 ते 15 मिनिटांनी उशीरा धावत आहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...