आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लेडीने आतापर्यंत घडविले आहेत 20 हजार कमांडो; मंगळसूत्र ठेवावे लागले होते गहाण!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉ.सीमा राव या देशातील एकमेव आणि पहिल्या महिला कमांडो ट्रेनर आहेत. विशेष म्हणजे त्या शूटरही आहेत. मागील 20 वर्षांपासून सीमा राव या इंडियन आर्मी, एअरफोर्स, नेव्हीसह पॅरामिलिट्री फोर्सच्या कमांडोंना ट्रेनिंग देत आहेत. आतापर्यंत त्यांना 20 हजार कमांडोंना प्रशिक्षित केले आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे सीमा या कामाच्या बदल्यात भारतीय लष्कराकडून एक रुपयाही घेत नाहीत.

 

मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्टप्राप्त‍

डॉ.सीमा राव यांनी मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे. सीमा या 30 यार्डच्या रेंजमधील व्यक्तीच्या डोक्यावरील सफरचंद लक्ष बनवू शकतात. डॉ.सीमा राव यांनी divyamarathi.com सोबत आयुष्यातील आव्हानात्मक एक्सपीरियन्स आणि अचिव्हमेंट्स शेअर केल्या आहेत.

 

बालपणी पाहिले होते डॉक्टर बनण्याने स्वप्न...
- 49 वर्षीय डॉ.सीमा राव यांनी सांगितले की, त्यांचा जन्म मुंबईतील वांद्रये येथे झाला. त्यांचे वडील प्रा.रमाकांत सिनारी हे एक फ्रिलान्सर लेखक होते. पोर्तुगिजांच्या तावडीतून गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात प्रा.सिनारी यांचे मोठे योगदान होते.
- देशसेवेच्या वारसा हा वडिलांकडून मिळाल्याचे सीमा सांगतात. त्या तीन बहिणी असून त्या सर्वात धाकट्या आहेत.
- वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचे त्यांचे स्वप्न होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा...डॉ.सीमा राव यांनी मंगळसूत्र ठेवावे लागले होते गहाण... अशा बनल्या देशातील पहिल्या महिला कमांडो ट्रेनर...

बातम्या आणखी आहेत...