आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ACCIDENT: एशियाड बस थेट घरात घुसली; सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील इंदापूर नाक्यावर राज्य परिवहन मंडळाची एशियाड बस थेट एका घरात घुसली. शनिवारी सकाळी 9 वाजून 10 मिनीटांनी हा अपघात झाला. या अपघातात घराचे मोठे नुकसान झाले आहे. भिकू मेहता यांचे हे घर आहे. दुसरीकडे, रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी, महाडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महाड शहराजवळील गांधारीफ नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर तालुक्यात शुक्रवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 2013 मध्ये सावित्री नदीवरील पूल वाहून गेला होता. त्यात दोन एसटी बससह सात वाहने वाहून गेली होती. त्यात 18 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...