आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाळ्या-खुरकत लसीवरुन पुन्हा एकदा महादेव जानकर यांच्यावर माफी मागण्याची नामुष्की

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील दोन कोटी गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांना आवश्यक असलेला लाळ्या-खुरकत आजारावरील लस खरेदी प्रक्रिया रखडवल्याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देऊनही चौकशी झाली नाही, असा धक्कादायक खुलासा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज विधान परिषदेत केला. यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना फैलावर धरत निविदाप्रक्रियेत घोळ घालून लस खरेदीला उशीर करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच विधानसभेमध्ये लाळ्या-खुरकत आजाराच्या लसीवरुन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना माफी मागावी लागली होती. तीच नामुष्की आजही जानकरांवर ओढवली.

 

वाढीव दराने लस विक्री केल्याबद्दल 90 लाखांचा दंड आकारला

इंडियन इम्युनॉलॉजी या कंपनीकडून 2016  साली वाढीव दराने लस विक्री केल्याबद्दल 90 लाखांचा दंड आकारला होता. तोच न्याय सातव्या निविदेमध्ये मंजूर केलेल्या बॉयोवेट प्रा. लि. या कंपनीला लावणार का? अशा प्रश्न उपस्थित केला यावर अधिवेशन संपण्याच्या आत चौकशी करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...