आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- प्राडा, मायकल कॉर्स, गूची, राडो सारख्या जगरातील प्रसिद्ध लक्झरी आणि महागड्या ब्रँडच्या किमती लाख रुपयांपेक्षा जास्त असतात. त्यामुळे इच्छा असूनही बहुतेकांना अशा महागड्या वस्तू खरेदी करता येत नाहीत. परंतु राडो कंपनीची घड्याळ तुम्ही निम्म्यापेक्षा जास्त किमतीत खरेदी करू शकतात, अशा मुंबईतील एका मार्केटची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे.
आम्ही चर्चा करतोय ती म्हणजे मुंबईतील सर्वात मोठे डुप्लिकेट्स ब्रॅंड मार्केट अर्थात मनीष मार्केटविषयी. मनीष मार्केटमध्ये सर्व लक्झरी ब्रॅंडची पहिली डुप्लिकेट्स कॉपी अथवा रिपिलीका आपल्या खर्या किंमतीच्या निम्म्या किंवा त्यापेक्षाही कमी किमतीत सहज खरेदी करता येते. यात कपडे, जोडे, घड्याळी, स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा समावेश आहे. जगातील लक्झरी ब्रँडची पहिली डुप्लिकेट कॉपी दोन ते चार हजार रुपयांत सहज मिळून जाते.
डुप्लिकेट उत्पादनांचे होलसेल मार्केट
मनीष मार्केट हे देशातील डुप्लिकेट उत्पादनांचे होलसेल मार्केट आहे. परंतु रिटेल ग्राहकही येथे खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे येथे दोन किमतीचे चलन आहे. पहिली होलसेल तर दुसरी रिटेल. मागील काही वर्षांत मनीष मार्केटच्या रिटेल ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. डुप्लिकेट ब्रॅंडचा आपले एक स्वतंत्र मार्केट आहे. प्रत्येक ब्रँडची पहिली डुप्लिकेट कॉपी तर मिळतेच सोबतच सेकंड हॅंड मोबाइल फोन व इलेक्ट्रीक उपकरणेही स्वस्त दरात मिळतात. यामुळे या उपकरणांची मागणी 40 टक्क्यांनी वाढली आहे. मनीष मार्केटमध्ये 2 हजारांहून जास्त दुकाने आहेत. मार्केटमध्ये दिवसाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
लक्झरी ब्रॅंडच्या डुप्लिकेट वस्तुंचे शोरूम
मनीष मार्केटमध्ये लक्झरी ब्रॅंडच्या डुप्लिकेट वस्तुंचे शोरूमही उघडण्यात आले आहे. शोरूममध्ये ग्राहकांना जवळपास प्रत्येक लक्झरी व महागड्या ब्रँडच्या डुप्लिकेट वस्तु पाहायला, खरेदी करायला आवडतात.
कुठून येतो माल..
दिल्ली, गुडगावसह चीन, इंडोनेशिया व थायलंडसारख्या देशातून आयात करण्यात आलेल्या डुप्लिकेट वस्तू मनीष मार्केटमध्ये उपलब्ध असतात. यात बूट, कपड़े, सौदर्य प्रसाधने, घड्याळी, फरफ्यूम, मोबाइल फोन्स, हँड बॅग्ज तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश आहे.
सावधान!
ग्राहकांनो सावधान! अशा मार्केटमध्ये दलालांची काही कमी नसते. तुम्हाला बोलण्यात अडकवून तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अशा मार्केटमधून एखादी वस्तू खरेदी करताना त्याची गारंटी दिली जात नाही. त्यामुळे वस्तु चांगल्या प्रकारे निरखून पारखून खरेदी करण्यातच आपला फायदा असतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... डुप्लिकेट ब्रॅंडची सर्वात मोठी बाजारपेठ.. मनीष मार्केटचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.