आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मनपा शाळेत 160 विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांमधून विषबाधा, एकीचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गोवंडी भागातील संजयनगरमधील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेतील 160 विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांमधून विषबाधा झाली. या सर्व मुलांना शुक्रवारी पालिकेच्या राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना चांदणी साहिल शेख (वय-12) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. उर्वरित मुलांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार, या मुलांना विषबाधा झाली असण्याची शक्यता आहे. मात्र, शाळेतून देण्यात आलेल्या जंतनाशक औषधांमुळेच ही विषबाधा झाली असावी, हे स्पष्ट सांगता येत नसल्याचे पालिकेच्या पेरिफेरिअल रुग्णालयांचे प्रमुख डॉ. प्रदीप जाधव यांनी सांगितले आहे. या मुलांना पोटात मळमळ होत होती आणि उलट्या होत होत्या. त्यामुळे अँटिबायोटिक्स देण्यात येत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले, तर पोलिसांचे एक प्रथक रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे सहायक पोलिस आयुक्त दिनेश देसाई यांनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...