आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIT बॉम्बेमध्ये सीनिअर्सकडून ज्यूनिअर्सचा लैंगिक छळ; फेसबुक पेजवरुन भंडाफोड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयआयटी बॉम्बेमध्ये सीनिअरकडून ज्यूनिअर्सचा लैंगिक छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर आयआयटी बॉम्बेच्या कन्फेशन पेजवरुन पीडित विद्यार्थ्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे. शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही विद्यार्थ्यांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

 

आरोपी विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतो. आयआयटी बॉम्बेच्या शिस्तपालन समितीकडे 15 ज्युनिअर्सनी लैंगिक छळ झाल्याबाबत तक्रारी केल्या आहेत. परंतु आरोपीला निलंबित करण्‍यासाठी परिस्थितीजन्य पुरावे पुरेसे नसल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

 

विशेष म्हणजे आयआयटीचे डीन सौम्य मुखर्जी यांनी आरोपीला 'मूड इंडिगो' या फेस्टिव्हलमध्ये मेंटॉर म्हणून नियुक्त केले होते.

 

तर पदवी प्रदान समारंभावर बहिष्कार...
आरोपी विद्यार्थ्याविरोधात तक्रार देऊनही त्याच्यावर कारवाई न झाल्यामुळे पीडित विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. आरोपी विद्यार्थ्यावर कारवाई न झाल्यास पदवी प्रदान समारंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...