आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांद्रे-वरळी सी लिंकजवळ तरंगते हॉटेल बुडाले; 15 जणांना वाचवण्यात यश, पाहा व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वांद्रे-वरळी सी लिंकजवळ तरंगते हॉटेल शुक्रवारी समुद्रात बुडाले. घटना घडली तेव्हा हॉटेलमध्ये 15 कर्मचारी होते. त्यांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

 

सूत्रांनुसार, आर्क हॉस्पिटॅलिटी कंपनीचे हे हॉटेल होते. वांद्रे-वरळी सी लिंक जवळील समुद्रात ही फ्लोटिंग हॉटेल       उभे करण्यात आली होती. पर्यटनाला चालना देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी फ्लोटिंग हॉटेल सुरू करण्यात आले होते. सध्या मुंबईत अशा तीन हॉटेल्स आहेत. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हे बोट एका बाजूला कलंडत असल्याचे कॅप्टन इरफान शिरगावकर यांच्या लक्षात आले. त्याने तात्काळ सर्व यंत्रणांच्या नियंत्रण कक्षांना फोन केले. वांद्रे पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचले. स्थानिकांच्या मदतीने बोटवरील कॅप्टनसह 15 कर्मचार्‍यांना सुखरुप बाहेर काढले.

 

सुरक्षेची ऐशीतैशी...

या घटनेमुळे फ्लोटिंग हॉटेलच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या हॉटेलच्या मालकाने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या का? या फ्लोटिंग हॉटेलला सर्व परवानग्या मिळाल्या आहेत का? मिळाल्या नसतील तर समुद्रात हॉटेल उतरवण्याची परवानगी कशी मिळाली? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... वांद्रे-वरळी सी लिंकजवळ तरंगते हॉटेल बुडतानाचे फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...