आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे महापालिका आयुक्तांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यु; अशी घ्या खबरदारी..यामुळे होतो हा आजार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची पत्नी सिद्धी जयस्वाल आणि मुलगी स्नेहा हिला डेंग्युची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. जयस्वाल यांचे निवासस्थान मुंबई महापालिका क्षेत्रात आहे. दोघींना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

 

यामुळे होतो डेंग्यू...
डेंग्यूचा प्रादुर्भाव करणाऱ्या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असते. सांडपाणी, गटारात डेंग्यूचे डास आढळत नाही. हा ताप इडिस डासांमुळे होतो. हा डास डेंग्यूस कारणीभूत असतो. डासांची निर्मिती करणाऱ्या  अळीचा रंग पांढरा असतो व ही अळी पाण्यात चेंडूसारखी खाली जाते व परत वर येते. डेंग्यूचे डास हे साधारणत: सकाळी किंवा सायंकाळी दंश करतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये इडिस डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यूचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

 

डेंग्यू तापाची लक्षणे..

तीव्र स्वरुपाचा ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, अंग दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या बाजूस दुखणे, रक्तमिश्रित शौच होणे, प्लेटलेटची संख्या कमी होणे आदी लक्षणे आढळून येतात.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा...डेंग्यूपासून वाचण्यासाठी अशी घ्या खबरदारी...

बातम्या आणखी आहेत...