आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • सावधान Mumbai; हाय टाईडची आज शक्यता, समुद्रात उसळणार 4.16 मीटरच्या लाटा Today High Tide In Mumbai

सावधान Mumbai; हायटाईडची आज शक्यता, समुद्रात उसळणार 4.16 मीटरच्या लाटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रविवारी (24 जून) रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईसह परिसर जलमय झाला आहे. आज मंगळवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने आणखी त्यात भर घातली आहे. या पावसाने मागील दोन दिवसांत एकूण चार जणांचा बळी घेतला आहे. हवामान विभागाने मुंबईत हायटाइडची शक्यता वर्तवली आहे.

 

हवामान विभागाने दिलेली माहिती अशी की, मंबईतील समुद्रात हायटाईड येण्याची शक्यता आहे. हायटाइडदरम्यान समुद्रात 4.16 मीटरच्या लाटा उसळण्‍याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईकरांना समुद्र किनार्‍यावर न जाण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

 

मुंबईकरांसाठी पुढील तीन दिवस धोक्याचे..

- हवामान विभागानुसार, मुंबईकरांसाठी पुढील तीन दिवस धोक्याचे आहे. स्कायमेटच्या हवामान तज्ज्ञांनुसार, 28 जूनपर्यंत मुंबईसह परिसरात अतिवृष्‍टी होण्याची शक्यता आहे.

 

आतापर्यंत पावसाने घेतला चार जणांचा बळी...

- मरिन लाइन्स परिसरात एमजी रोडवर मेट्रो सिनेमाच्या जवळ झाड कोसळून त्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

-  ठाण्यातील वाडोळ येथे घराची भिंत पडल्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होत. या घटनेत मुलाचे आई-वडील जखमी झाले आहेत. 

- सोमवारी 18 वर्षीय नागेंद्र नागार्जुनला आपला जीव गमवावा लागला. तो मालाड परिसरातील उघड्या नाल्यात पडला होता.

 

बातम्या आणखी आहेत...