आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • सेल्फीचा मोह..समुद्राच्या लाटेने मित्राला ओढून नेले, मित्रांना समजलेच नाही! Tourists Drown Off Goa Beaches While Clicking Selfies

सावधान! सेल्फीचा मोह.टाळा.समुद्राच्या लाटेने मित्राला ओढून नेले, मित्रांना समजलेच नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सेल्फीचा मोहापायी एक तरुणाला जीव गमवावा लागला आहे.  समुद्र किनार्‍यावर  बसलेल्या तीन मित्रांपैकी एक जण मोठ्या लाटेसह समुद्रात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गोव्याच्या सीकेरी किनाऱ्यावर रविवारी (ता.17) रोजी  घडली.

 

मिळालेली माहिती अशी की, शशीकुमार वासण (वय- 33)  असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळ तामिळनाडू येथील होता. काही वेळाने त्याचा मृतदेह वाहून किनाऱ्यावर आला. पोलिसांनी त्याचा मृतदेह गोमेकॉच्या शवागृहात पाठवून पुढील तपास सुरु आहे.

 

तामिळनाडूतील चार मित्र गोव्याला फिरण्यासाठी आले होते. सूर्योदय पाहण्यासाठी ते आग्वाद किल्ल्याखालील सीकेरी येथील खडकावर गेले होते. चौघांपैकी तीन जण खडकावर बसून सेल्फी आणि लाटांचा आनंद घेत होते. तर चौथा मित्र त्यांचा व्हिडिओ बनवत होता. त्यावेळी आलेल्या मोठ्या लाटेने तिघांपैकी एका तरुणाला खेचून नेले. इतर दोघे खडकाच्या पाठीशी ढकलले गेल्याने ते थोडक्यात बचावले.

 

दुसरीकडे, बागा समुद्रकिनारी अशीच एक घटना घडली आहे. मंगळुरुमधील एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.  दिनेश कुमार रंगनाथन असे मृत तरूणाचे नाव आहे.

 

दरम्यान, मागील आठवडयात अकोल्यातील पाच तरुण कळंगुट बीचवर बुडाले होते. त्यातील दोघांचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सीकेरी किनाऱ्यावर सापडले होते.

 

पुढील स्लाइड्‍वर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...