आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओमान समुद्र किनार्‍यावर धडकले मेकुनू चक्रीवादळ, गुजरातचे जहाज बुडाले, 4 बेपत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/सलाया- ओमानच्या समुद्र किनार्‍यावर मेकुनू चक्रीवादळ धडकले आहे. चक्रीवादळाच्या तडाखा बसून सलाया-गुजरातचे एक जहाज बुडाल्याची माहिती समोर आली आहे. चार जण बेपत्ता असल्याचेही सांगितले जात आहे.

 

शारजहाँहून ओमानला जात असलेले सुमारे 450 टन क्षमतेच्या या जहाजावर नऊ जण होते. त्यापैकी पाच जणांना वाचवण्यात आले असून चार   जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 'आता-ए-ख्वाजा' हे जहाज गुजरातमधील होते. ते ओमानमधील सिकोतेर बंदरावर जात होते. हे जहाच 5 मे 2018 रोजी ओमानकडे रवाना झाले होते. 23 मे रोजी या जहाजाला चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि सामनासह या जहाजाला जलसमाधी मिळाली.

 

पोरबंदरमध्ये क्रेनच्या मदतीने बोटची पार्किंग
- पोरबंदरच्या फिशरीज हार्बरवर जवळपास 5000 बोट पार्क करण्यात आल्या आहेत. क्रेनच्या मदतीने समुद्र किनार्‍यावर 3 किलोमीटर परिसरात ही पार्किंग करण्‍यात आली आहे. मेकुनू चक्रीवादळाचा पश्चिम किनार्‍याला जबरदस्त तडाखा बसला आहे.

 

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा..
भारतीय हवामान विभागाने मेकुनू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण किनारपट्टीभागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 

ओमानमधील सोकोत्रामध्ये मुसळधार पाऊस , 17 बेपत्ता-

 मेकुनू चक्रीवादळामुळे ओमानमधील सोकोत्रा बेटावर गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 17 जण बेपत्ता आहेत. ताशी 110 ते 140 किमीच्या वेगाने हे वादळ ओमानच्या समुद्र किनार्‍यावर धडकले.

-समुद्रात 8 ते 10 मीटर ऊंचीच्या लाटा उसळल्या आहेत. 150 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...