आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Monsoon Alert:..तरच घराबाहेर पडा; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचे; हवामान विभागाचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात 24 तासांपासून कोसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी तुंबले आहे.यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने तिन्ही रेल्वे भार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस मुसधार पावसाचे असून पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गरज पडल्यावरच घराबाहेर पडावे, असा इशारा महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने दिला आहे.

 

राज्यात मागील तीन दिवसांत मुंबईसह कोकण व पूर्व विदर्भात दमदार पाऊस झाल्यानंतर आता दोन दिवस दक्षिण मध्य, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

 

मुंबई, कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उत्तर-मध्य महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मंगळवारी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळतील. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर...

मुसळधार पावसाची पहाटेपासूनच जोरदार बॅटिंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.

 

मुंबईच्या अनेक भागात पाणी साचल्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घाटकोपर येथील रेल्वे स्टेशनवरील एका पुलाला तडे गेले आहेत. त्यामुळे या पूल दळणवळणासाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मुंबईतील पावसाच्या जोरदार बॅटिंगचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...