आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP ने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे, शिवसेनेच्या वाघाला गोंजारणे आता शक्य नाही, उद्धव ठाकरेंचे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- '2019 चे चित्र वेगळे असेल, पण भाजप अजूनही 2014 च्या सुवर्णकाळात रमून बसला आहे. भाजपला मित्रांची गरज नाही. ते मजबूत व स्वयंभू आहेत. शिवसेनेने सोबत असावे असे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उडत उडत सांगितले आहे. हा सद्विचार त्यांना 2014 साली सुचला नाही व सत्ता मिळाल्यावरही ते विनय हरवून बसले. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले तर त्यासाठी जमीन नाही.

 

सुवर्णकाळातील सुवर्ण कौले फुलपूर-गोरखपूरमधून उडून गेल्यावर काही गोष्टी सुचू लागल्या. भाजपने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत!' परंतु शिवसेनेच्या वाघाला गोंजारणे आता शक्य नाही, अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उत्तर दिले आहे. 

 

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्याच नेतृत्वात एनडीएचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करत भाजप, शिवसेनेशी युती करणार असल्याचे संकेत अमित शहा यांनी नुकतेच मुंबईत दिले होते. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त (6 एप्रिल) अमित शहा बीकेसी मैदानावर आयोजित महामेळाव्याला उपस्थित होते. अमित शहा यांनी आपल्या भाषणात तसेच पत्रकारांशी संवाद साधताना आगामी काळातही शिवसेना हा आमचा मित्र पक्ष राहावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... सामनाच्या संपादकीय मधून अमित शहा यांच्यासह भाजपबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे....?

बातम्या आणखी आहेत...