आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • उद्धव ठाकरे यांचा अरविंद केजरीवालांना फोन, आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा Uddhav Thackeray Support To Delhi CM Arvind Kejariwal

उद्धव ठाकरे यांचा अरविंद केजरीवालांना फोन, आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली-आयएएस अधिकाऱ्यांच्या संप मिटवण्याची मागणी घेऊन उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल धरणे आंदोलन करत आहे. आज या आंदोलनाचा आठवा दिवस आहे. केजरीवाल यांच्या आंदोलनाला आता शिवसेनेनेही पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली तसेच त्यांना पाठिंबा दिल्याचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले आहे.

 

दिल्ली अरविंद केजरीवाल जे काही करत आहे ते योग्य आहे. त्यांची आंदोलनाची पद्धत वेगळी आहे. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. केजरीवाल सरकारला दिल्लीकरांनी निवडूण दिले आहे. जनतेसाठी काम करण्याचा त्यांचा अधिकार आहे. परंतु त्यांच्यासोबत जे काही होत आहे, ते लोकशाहीला मारक ठरत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. 

 

4 मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा...
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आंदोलनाला आतापर्यंत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. यात केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू आणि कर्नाटकचे एच.डी.कुमारस्वामी यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...