आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांनो सावधान! UGC ने जाहीर केली 24 बोगस विद्यापीठांची यादी, नागपूरचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विश्वविद्यालय किंवा विद्यापीठ (युनिव्हर्सिटी) असा आपल्या नावासमोर उपाधी लावणाऱ्या देशात एकूण 24 संस्था आहेत. या संस्थांना कोणतीही शैक्षणिक पदवी देण्याचा नियमाने अधिकार नाही. त्या निव्वळ शैक्षणिक संस्था आहेत, असा खुलासा करत या नकली विद्यापीठापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे, त्यामध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन विश्वविद्यालय अनुदान आयोगाने आज (मंगळवार) केले आहे.

 

कोणतेही विश्वविद्यालय हे केंद्र, राज्य किंवा प्रांताच्या अधिनियमाच्या मंजुरीनंतर किंवा विश्वविद्यालय अनुदान आयोग अधिनियम 1956 अन्वये अस्तित्वात येत असते. मात्र देशात 24 शैक्षणिक संस्थांनी आपल्या नावासोबत विश्वविद्यालय अशी उपाधी धारण केली आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या राज्यांतील शैक्षणीक संस्थांचा मोठ्या संख्येत भरणा आहे. महाराष्ट्रात नागपूर येथे राजा अरेबिक युनिर्व्हसिटी नावाची एकमेव शैक्षणिक संस्था आहे, जिने आपल्या नावासोबत अशी युनिर्व्हसिटी अशी उपाधी धारण केली असल्याचे युजीसीने म्हटले आहे.

 

या 24 बोगस विद्यापीठांची यादी युजीसीने प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये दरभंगाचे मैथीली विश्वविद्यालय, दिल्लीची कमर्शिअल युनिव्हर्सिटी, केरळचे सेंट जॉन विश्वविद्यालय, प्रयागचे गांधी विद्यापीठ, बेळगावची वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्लीची इंडियन इन्सिटट्युट ऑफ सायन्स, कोलकाताचे इनस्टिट्यूट ऑफ अल्टरनेटीव्ह मेडिसीन, नोएडाचे इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद या संस्थांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...