आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pregnancy Diagnosis: राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंधक समितीच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम २००३ ची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या राज्य तपासणी व संनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची निवड करण्यात आली. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम २००३ च्या तरतुदीनुसार नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रांची तपासणी तसेच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य महिला आयोग यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी व संनियंत्रण समिती पुनर्गठीत करण्यासही शासनाने मंजुरी दिली आहे. 


या समितीत रहाटकरांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. त्यात आमदार मेधा कुलकर्णी, आमदार डॉ. देवराव होळी, सेवानिवृत्त न्यायाधीश ऊर्मिला जोशी, आमदार राहुल पाटील, आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह नगरविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. सदर समितीचा कार्यकाळ ३ वर्षांचा असणार आहे. दरम्यान, राहटकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्याने त्यांच्या निवडीचा फायदा होणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...