आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदींना ‘राेड शाे’मध्ये उडवण्याचा कट, मुख्यमंत्र्यांनाही संपवण्याची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे / नवी दिल्ली - पुण्यात ३१ जानेवारी राेजी झालेल्या एल्गार परिषदेशी संबंधित पाच अाराेपींना पुणे पाेलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडे सापडलेल्या पत्रातून नक्षलवादी देशात माेठा घातपात घडवून अाणण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले अाहे. राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणेच देशात माेठे अात्मघाती हल्ले घडवून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची राेड शाेदरम्यान हत्या करण्याचा त्यांचा मनसुबा या पत्रातून समाेर अाला अाहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धमकी देणारी दाेन पत्रे मंत्रालयात पाठवण्यात अाली अाहेत. त्यामुळे देश व राज्य पातळीवरील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या अाहेत.  


दिल्ली येथून अटक केलेला नक्षल समर्थक राेना विल्सन याच्या लॅपटाॅपमध्ये सीपीअाय (एम) नेता काॅम्रेड प्रकाश याच्या नावाने लिहिलेले एक पत्र पाेलिसांना सापडले हाेते. त्यात ‘नरेंद्र माेदी यांचे प्रस्थ वाढत राहिले तर अापणास सर्व फ्रंटवर धाेका निर्माण हाेऊ शकताे, त्यामुळे राजीव गांधींसारखी अात्मघाती घटना करावी लागेल,’ असा उल्लेख सापडला अाहे. सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनीही गुरुवारी पुणे काेर्टात माअाेवाद्यांचा अात्मघातकी हल्ल्याचा कट असल्याचा गाैप्यस्फाेट केल्याने या कटाला दुजाेरा मिळाला अाहे. १८ एप्रिल २०१७ चे हे पत्र काेर्टातही सादर करण्यात अाले अाहे.   

 

काय अाहे नक्षलवाद्यांच्या पत्रात  
पाेलिसांना सापडलेल्या नक्षलवाद्यांच्या पत्रात नमूद करण्यात अाले अाहे की, माेदी हे अादिवासींविराेधात काम करत अाहेत. बिहार अाणि पश्चिम बंगाल या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा पराभव हाेऊनही त्यांनी यशस्वीरीत्या देशातील इतर १५ राज्यांत सत्ता स्थापन केली अाहे. अशा प्रकारे त्यांची वाटचाल सुरू राहिल्यास (अापल्या) पार्टीचे अस्तित्व सर्व पातळीवर धाेक्यात येईल. विराेधातील सूर दाबण्याचा प्रयत्न माेठ्या प्रमाणात हाेईल. त्यामुळे काॅम्रेड किसन अाणि काही ज्येष्ठ नेत्यांनी ‘माेदीराज’ संपवण्याकरिता ठाेस पावले उचलण्याची गरज असल्याची भूमिका या पत्रात मांडली अाहे. त्यासाठी अात्मघातकी हल्ल्याची याेजनाही सुचवली हाेती.  माेदींवर राेड-शाेदरम्यान हल्ला करण्याची चांगली संधी असून पार्टी जिवंत ठेवण्याकरिता अंतिम त्यागाची भूमिका घेण्यावर अापला विश्वास अाहे, असे पत्रात नमूद अाहे. तसेच  जहाल नक्षलवादी काॅम्रेड साईबाबाची सुटका करण्याकरिता विविध कार्यक्रम अायाेजित करण्याची चर्चाही असल्याचे सांगण्यात अाले अाहे.


हा तर माेदींचाच फंडा : काँग्रेस  
दरम्यान, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मात्र माेदींच्या हत्येच्या कटाबाबत अालेल्या बातम्यांवर शंका व्यक्त केली. ते  म्हणाले, ‘या धमक्या पूर्णपणे खाेट्या अाहेत असे मी म्हणणार नाही. मात्र पंतप्रधान माेदींचेच हे फंडे असू शकतात. यापूर्वी जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री हाेते तेव्हाही त्यांच्या हत्येच्या चर्चा घडवून अाणल्या हाेत्या. जेव्हा त्यांची प्रसिद्धी कमी हाेऊ लागते तेव्हा अशा कटाच्या बातम्या पसरवल्या जातात. त्यामुळे अशा चर्चेत किती तथ्य अाहे याची चाैकशी व्हायलाच हवी.’

 

राजनाथ म्हणाले... नक्षलवादी सध्या पराभूत मानसिकतेत  
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत अाम्ही गंभीर अाहाेत. नक्षलवादी सध्या पराभूत मानसिकतेत अाहेत. त्यांच्या हिंसाचाराला माेठ्या प्रमाणावर पायबंद बसलेला अाहे. सध्या फक्त ९० जिल्ह्यात नक्षली सक्रिय असून १० जिल्ह्यांतच त्यांचा प्रभाव अाहे. ईशान्येकडील राज्यातून लवकरच नक्षलवाद संपवला जाईल. सध्या तेथील कारवाया ३३ % कमी झाल्या अाहेत.’

बातम्या आणखी आहेत...