आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट म्हणजे काय रे भाऊ? महाराष्ट्राचा अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी, हे नक्की वाचा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- यंदाचे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून चांगले वादळी ठरले आहे. देशाचे रक्षण करणार्‍या जवानांबद्दल बेताल वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारकांवर बडतर्फच्या कारवाईसाठी सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी आमदार आक्रमक झाले आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चांगलाच गदारोळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या 9 मार्चला सन 2018-19 चा अर्थसंकल्प अर्थात बजेट सादर करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमाच्या घटनेसह कायदा व सुव्यवस्था, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील गोंधळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या तसेच 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्यासह मंत्रालयातील आत्महत्यांच्या घटना, अवकाळी पाऊस-गारपीटमुळे झालेले नुकसान आणि सरकारी तिजोरीची नाजूक अवस्था पाहाता राज्याच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळतानाच निवडणुकांच्या तोंडावरील पुढील वर्षाचा लोकाभिमुख अर्थसंकल्प मांडण्याचे मोठे आव्हान सरकार समोर आहे.

अर्थसंकल्प म्हटले की, सर्वसामान्यांच्या दृष्टीने महागाई एवढाच विषय असतो; पण अर्थसंकल्पातील जमा-खर्चाचा सामान्य माणसाच्या जीवनावर देखील थेट परिणाम होतो. नेमके काय महागणार, काय स्वस्त होणार, याची सर्वांनाच उत्सुकता असते. मात्र, अर्थसंकल्पाशी संबंधित कररचना, राज्य आणि केंद्र सरकार अर्थसंकल्प संबंध, आर्थिक वृद्धी, गुंतवणूक, बँकांचे व्याजदर, राज्यातील नवीन शासकीय योजना अशा अनेक बाबी सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रभाव टाकतात. या संकल्पना सहज आणि सोप्या भाषेत आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे.

 

बजेट म्हणजे काय? वित्तीय तूट म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी पुढील इन्फोग्राफिक्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...