आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • सेल्फी घेताता तोल गेल्याने माथेरानमध्ये दरीत कोसळून विवाहितेचा मृत्यू Woman Dies After Falling In Cliff While Clicking Selfie Matheran

सेल्फी घेताना तोल गेल्याने माथेरानमध्ये दरीत कोसळून विवाहितेचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सेल्फीच्या नादाने पुन्हा एका महिलेचा बळी घेतल्याची घटना माथेरान येथे घडली आहे. सेल्फी घेताना तोल गेल्याने दरीत कोसळून एका 35 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला आहे. काल (मंगळवार) सायंकाळी लुईसा पॉईंटवर ही दुर्दैवी घटना घडली.

 

सरिता चौहान (रा.दिल्ली) असे मृत महिलेचे नाव आहे. सरिता या पती आणि मुलांसोबत माथेरान येथे पर्यटनासाठी आली होती.

 

सूत्रांनुसार, सरिता आपल्या कुटुंबियांसोबत लुईसा पॉईंटवर सुमारे 500 ते 600 फूट खोल दरीजवळ असलेला कठडा ओलांडून सेल्फी काढण्यासाठी गेल्या होत्या. अचानक जोराचा वारा आल्याने सरिता यांचा तोल गेला आणि त्या दरीत कोसळल्या. पोलिस आणि बचाव पथकाने सरिता यांचा शोध घेतला. आज (बुधवार) सकाळी खोल दरीतून सरिता यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...