आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन: सफरनामा स्वतंत्र विचारांचा..या महिला तुमच्यासाठी नक्कीच प्रेरक ठरतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नव्याचा ध्यास घेत एखाद्या समुहाने घडवले तरच नव्या. स्वतंत्र व्यवस्थेची निर्मिती होते. स्वतंत्र विचारांची अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रत्येक टप्प्यावर आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनच स्वातंत्र्याच्या विचारांनी प्रेरित होते. त्यांची स्वतंत्र प्रजा आणि प्रचंड मेहनतीनेच महाराष्ट्राला समृद्धीच्या शिखरापर्यंत पोहोचले आहे. स्वातंत्र्याचा ध्यास आणि त साध्य करण्यासाठी लढण्याचे विचार हाच तर आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा होता.

 

यंदाच्या महिला दिनी आम्ही आपल्यासाठी महाराष्‍ट्रातील अशाच काही जिद्दी महिलांची माहिती घेऊन आलो आहे. जेव्हा एखादी स्त्री जिद्दीने उभी राहाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती जागत विक्रमांतही अग्रगण्य असते, हे या महिलांनी सिद्ध करून दाखवले आहे. प्रतिकुल परिस्थितीवर मात करणार्‍या या महिला तुमच्यासाठी नक्कीच प्रेरक ठरतील.

 

स्वतंत्र विचारांनी वाढवला देशाचा मान- प्रज्ञा पाटील, नाशिक
जेव्हा एखादी स्त्री जिद्दीने उभी राहण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती जागतिक विक्रमांतही अग्रगण्य असते ही गोष्ट सिद्ध केली ती नाशिकच्या प्रज्ञा पाटील यांनी. २००४ पासून महिला उद्योजिका म्हणून काम करणाऱ्या प्रज्ञा यांनी सलग १०३ तासांचा योगसाधनेचा विश्वविक्रम केलेला आहे. आपल्या कार्यामध्ये अग्रेसर असताना, त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या अनेक अडचणींवर मात करुन त्यांनी हा किताब मिळवला आहे.

 

वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. पण घरातील वैयक्तिक अडचणींमुळे त्यांना विभक्त व्हावे लागले. ज्या प्रमाणात त्यांना कोणाच्या तरी सोबतीची गरज होती त्याच्या अगदी उलट त्या एकट्या पडत चालल्या होत्या. २००४ मध्ये विभक्त परिवारामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी व्यवसायास सुरुवात केली. त्यांनी आपल्या बी.कॉम पर्यंतच्या शिक्षणामध्ये कारखान्यातील काम कधी केले नव्हते. अचानक कंपनीची सगळी जबाबदारी, पूर्वी घडलेल्या नुकसानामुळे कंपनी पूर्ण डबघाईला गेलेली होती. कंपनीतील यंत्रणा सगळी बंद होती, उत्पादन थांबलेले होते. अशा परिस्थितीमध्ये कंपनी पुन्हा उभी करणे, हे मोठे आव्हान त्यांनी पेललेच नाही, तर एक वर्षात पुनर्पदावर आणली. २०१० मध्ये त्यांनी यशस्वी महीला उद्योजिका हा पुरस्कार मिळाला. या नंतर योगाभ्यासात येण्याचे कारण होते त्यांचे आजारपण. पूर्वीपासून वयाच्या १० व्या वर्षांपासून योग करणाऱ्या प्रज्ञा यांनी आपल्या आजाराबद्दल विचारदेखील केलेला नव्हता.

 

प्रज्ञा पाटील वयाच्या १० व्या वर्षापासून योगाभ्यास करतात. २०१२  मध्ये एका भीषण आजाराला त्यांना सामोरे जावे लागले. त्या आजारातून बऱ्या होण्यासाठी त्यांनी योग विद्याधाम येथे उपचार घेण्यास सुरुवात केली. योग गुरु विश्वासराव मंडलिक यांनी या वेळी त्यांना आजारातून बरं करण्यासाठी उपचार सुरु केले. आजारातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी २०१३ ला योग शिक्षिका ही पदवी प्राप्त केली. एवढ्या वर्षांची साधना त्यांनी आपल्या कामामध्ये उतरवली. या नंतर १०३ तासांचा योग मॅरेथॉनचा विश्वविक्रम नोंदवून त्यांनी आपल्या जिद्दीचा नवा आदर्श महिलांसमोर ठेवला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... प्रेरणादायी महिलांच्या यशोगाथा...

बातम्या आणखी आहेत...