आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जो कोणी बीफ खाऊ इच्छितो त्याने खुशाल ते खावे, यासाठी महोत्सवाची काय गरज: उपराष्ट्रपती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बीफ पार्टी आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अाहे. ‘जो कोणी बीफ खाऊ इच्छितो त्याने खुशाल ते खावे, पण यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्याची गरज काय,’ असा प्रश्न त्यांनी साेमवारी उपस्थित केला. मुंबईतील एका महाविद्यालयात अायाेजित कार्यक्रमात ते बोलत होते.   ‘संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या नावाचा काही जण  जप करत आहेत. ही दुर्दैवी बाब आहे. पालक पाल्यांची क्षमता ओळखू शकत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत,’ असेही ते म्हणाले. 

 

उपराष्ट्रपती, मुंबईतील 'आर.ए.पोतदार कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स'च्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, 'मी स्वत: मांसाहारी आहे. कुणी काय खावे आणि काय खाऊ नये, हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. परंतु काही लोक विनाकारण प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देतात आणि बेताल वक्तव्य करतात.

 

देशाची संसद उडवून देण्याचा ज्याने कट रचला तो अफझल गुरु, याच्या नावाचा काही लोक जप करत आहेत. नेमके काय चालले आहे, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...