आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत जिममध्ये वेट लिफ्टिंग करताना तरुणाला अचानक कार्डियाक अरेस्ट; Video व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जिममध्ये वेट लिफ्टिंग करत असताना एक तरुण कार्डियाक अरेस्ट येऊन खाली कोसळला. अदनान मेनन (22) असे या तरुणाचे नाव आहे. अदनानवर सध्या भेंडी बाजार परिसरातील साबो सिद्दिकी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर अदनानचे ब्रेन हॅमरेज झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सां‍गितले आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, अदनान हा क्रॉफर्ड मार्केट भागात राहातो. तो नेहमी प्रमाणे 7 जुलैला मुंबई सेंट्रलमधील जिममध्ये गेला होता. वेट लिफ्टिंग करत असताना तो खाली कोसळला. इतर सहकार्‍यांनी त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याला कार्डियाक अरेस्ट आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नंतर त्याला ब्रेन हॅमरेजही झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... या घटनेचा व्हिडिओ आणि कार्डियाक अरेस्ट आल्यास काय उपाय कराल?

 

बातम्या आणखी आहेत...