आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार डान्सर भाड्याच्या फ्लॅटमध्ये चालवत होती आयपीएल बेटिंग रॅकेट, RAID पडताच झाली फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- आयपीएलवर बेटिंग लावणा-या एका बार डान्सरच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य सूत्रधार बार डान्सर फरार झाली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लॅपटॉप, 1.60 लाखाची रक्कम, तीन स्मार्टफोन आणि फोन नंबर असलेली डायरी इत्यादी सामान जप्त केले असून डान्सरचा शोध सुरु आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,       मालाडच्या एका बिअर बारमध्ये काजल नावाची डान्सर काम करते. तिने आपल्या साथीदारांच्या मदतीने आईपीएलवर बेटिंग लावणाचे रॅकेट चालू केले होते. यासाठी तिने डोंबिवलीत एक फ्लॅटही भाड्याने घेतला होता. पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला असता गौतम सावळा, निखिल संपत, नितीश पंजानी या तीन आरोपींना अटक केली . तसेच काजलचा साथीदार रामभय्यालाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बेटेन्टेक या अॅपच्या मदतीने ते हे बेटींग रॅकेट चालवत होते. बार डान्सर काजल अद्याप फरार असून पोलीस तातडीने तिचा शोध घेत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...