आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्त्रायलचे पीएम मुंबईत: नेतन्याहूंची आज रात्री \'शलोम बॉलिवूड\'ला हजेरी, बिग बींची उपस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेतन्याहू बुधवारी रात्री उशिरा पत्नी सारासोबत मुंबईत दाखल झाले. एयरपोर्टवर सीएम देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. - Divya Marathi
नेतन्याहू बुधवारी रात्री उशिरा पत्नी सारासोबत मुंबईत दाखल झाले. एयरपोर्टवर सीएम देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

मुंबई- इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आपल्या भारत दौ-याच्या पाचव्या आज मुंबईतील सीईओ यांच्या बिजनेस सेमिनारमध्ये सहभागी होतील. तसेच नरीमन हाऊसमध्ये जाऊन 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील आपले आई-वडिल गमावलेल्या मोशेला भेटतील. या दरम्यान ते मुंबई हल्ल्यात मारले गेलेल्या शहीद पोलिसांना आणि नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतील. सायंकाळी ते शलोम नावाच्या एका बॉलिवूडच्या प्रोग्रॅममध्ये सहभागी होतील. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉलिवूड पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

बिझनेस मिटिंगमध्ये नेतन्याहू म्हणाले, येणारा काळ सर्जनशील व्यक्तींचाच- 

 

- नेतन्याहू बुधवारी रात्री उशिरा पत्नी सारासोबत मुंबईत दाखल झाले. एयरपोर्टवर सीएम देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. ते मुंबईतील हॉटेल ताजमध्ये थांबले आहेत. 
- नेतन्याहू यांनी आज सकाळी हॉटेल ताजमध्ये मोठ्या उद्योगपतीशी चर्चा केली. यात आनंद महिंद्रा, अजय पिरामल, अदी गोदरेज आणि चंदा कोचर यांचा समावेश होता. 
- सीईओच्या बिजनेस सेमिनारमध्ये भाग घेताना नेतन्याहू म्हणाले की, येणारा काळ फक्त इनोव्हेटिव्ह लोकांचाच असेल. आम्ही तुम्हाला फक्त प्रोत्साहित करू शकतो, सपोर्ट करू शकतो. 
- इस्त्रायली पीएम यानंतर ताज हॉटेलमध्येच इंडिया- इस्त्रायल बिजनेस समिटला अॅड्रेस करतील. यात महाराष्ट्राचे मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होतील.

 

फडणवीसांची वेगळी भेट घेणार-


- नेतन्याहू आणि फडणवीस यांची एक वेगळी मीटिंग होणार आहे. यानंतर नेतन्याहू मुंबईतील 2008 मधील दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहतील. 
- इस्त्रायली पीएम यानंतर नरीमन हाऊसमध्ये जातील, जेथे ते 11 वर्षाच्या मोशे हॉजबर्गला भेटतील. मोशेचे पिता रबी गेवरिल हॉजबर्ग आणि आई रिवका नरीमन हाऊसमध्ये 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ल्यात मारले गेले होते.

 

शलोममध्ये सहभागी होतील नेतन्याहू-

 

- नेतन्याहू गुरूवारी सायंकाळी मुंबईतील शलोम बॉलिवूड नावाच्या प्रोग्रॅममध्ये भाग घेतील. इस्त्रायली भाषेत शलोमचा अर्थ सलाम असा होतो.
- या प्रोग्रॅममध्ये अमिताभ बच्चन, बॉलिवूड प्रोड्यूसर्स, डायरेक्टर्स आणि अॅक्टर्स सामील होतील.
- या प्रोग्रॅमचा उद्देश आहे बॉलिवूडला इस्त्रायलमध्ये फिल्म बनविण्याचे आमंत्रण देणे. यासाठी इस्त्रायल टॅक्समध्ये सूट आणि इतर काही सेवा-सुविधा देण्यास तयार आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....