आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- इस्त्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतन्याहू सहा दिवसाच्या भारत दौ-यावर आहेत. दौ-याच्या शेवटच्या टप्प्यात ते मुंबई दौ-यावर आहेत. बुधवारी रात्री नेतन्याहू पत्नी सारासह अहमदाबादहून मुंबईत दाखल झाले. त्याआधी नेतन्याहू यांनी नवी दिल्ली, आग्रा आदी ठिकाणी भेटी दिल्या. आग्र्यातील ताजमहालच्या प्रेमात पडलेले ते दिसले.
पत्नी सारासह त्यांनी ताजमहलसोबत विविध पोज देत पत्नीवरील प्रेम दाखवून दिले. यानंतर त्यांनी अहमदाबादमध्ये रोड शो केला तसेच मोदींसोबत पतंगबादी केली. गुरूवारी मुंबईत त्यांनी देशातील बड्या उद्योगपतींसोबत बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बिझनेस समिटला हजेरी लावली. मुंबईतील ज्यू समाजाचे प्रतिक असलेल्या नरिमन पाईंटवरील छबाड हाऊसला त्यांनी भेट दिली. गुरूवारी सायंकाळी ते शलोम बॉलिवूडच्या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
आज या निमित्ताने आम्ही नेतन्याहू व त्यांची पत्नी सारा यांचे भारत दौ-यातील निवडक फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत.
पुढे स्लाईडद्वारे फोटोजमधून पाहा, कसा होता नेतन्याहू यांचा भारत दौरा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.