आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, कोकण परिसरात पुढील 3-4 दिवस पावसाची शक्‍यता, मात्र तीव्रता कमी होईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-   मुंबईसह कोकण विभागात पुढील 3-4 दिवस पाऊस कायम राहिल, मात्र त्‍याची तीव्रता कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्‍यामुळे येत्‍या दिवसांत मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळण्‍याची शक्‍यता आहे. मागील सलग 3 दिवस पावसाने झोडपल्‍याने मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले होते.  विरार, नालासोपारा, वसई, डहाणू या भागात तर अक्षरश: पूरजन्‍य स्थिती निर्माण झाली होती. याचा फटका लांब पल्‍ल्‍याच्‍या गाड्यांना बसल्‍याने अनेक प्रवासी रेल्‍वेत अडकून पडले होते.

 

कमी झालेला पाऊस 13, 14 जुलैनंतर पुन्‍हा मुसळधार बसेल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे यांनीही अंधेरी व आजूबाजूच्‍या परिसरात कमी पावसाची शक्‍यता आहे, अशी माहिती ट्विटरवरून दिली आहे. मात्र त्‍यांनी विरार, चेंबूर, नालासोपारा या भागात मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. यामुळे या भागात आणखी पाणी साचेल, असे त्‍यांनी म्‍हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...