आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे. जे हाॅस्पिटल मारहाणीचे प्रकरण- मार्ड' चा संप सुरूच राहणार, सायनचे डाॅक्टरही रजेवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डाॅक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न फसला आहे. या संदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची आज 'मार्ड'च्या प्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा 'मार्ड'नं घेतला आहे. याला पाठिंबा देत सायन रुग्णालयातील डाॅक्टर एक दिवसाच्या सामुहिक रजेवर गेले आहेत.

 

शनिवारी  जे. जे. रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना एका रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली होती. या हल्ल्याच्या निषेधार्थ जे. जे.तील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. महाजन यांनी आज संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या बैठकीत डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. सुरक्षेचे सर्व उपाय करण्याचे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले. तसंच, आश्वासनांच्या पूर्ततेची शहनिशा करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत सर्व्हे करण्याचीही त्यांनी ग्वाही दिली. मात्र, यावर डॉक्टरांचे समाधान झाले नाही. 

 

डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून डॉक्टर सुरक्षेचा प्रश्न मांडत आले आहेत. मात्र, आश्वासनाशिवाय काहीच होत नाही. त्यामुळं आता ठोस कार्यवाही होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय घेतला आहे. 

बातम्या आणखी आहेत...