आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 हल्ल्यात आई वडील गमावलेला मोशे 9 वर्षांनी मुंबईत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- २००८ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात माता-पित्याचा मृत्यू झाला. मात्र, या हल्ल्यातून २ वर्षांचा मोशे हॉल्झबर्ग बचावला होता. हल्ल्यानंतर ९ वर्षांनी त्याने मंगळवारी प्रथमच मुंबईतील छाबड हाऊसला भेट दिली.

 

आमच्यासाठी खास दिवस 
- रब्बी होल्ट्सबर्ग नचमॅन म्हणाले की, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. सुदैवाने मोशेला पुन्हा भारतात येता आले. मुंबई आता अधिक सुरक्षित आहे. 
- 26 नोव्हेंबर 2008 ला जेव्हा मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हा मोशे 2 वर्षांचा होता. दहशतवादी हल्ल्यात मोशेची आई रिवका आणि पिता गेवरिल होल्ट्जबर्ग यांचा मुत्यू झाला होता. 
- दहशतवाद्यांनी ताज हॉटेलबरोबरच नरीमन हाऊसलाही टार्गेट केले होते. याठिकाणी 2 वर्षांचा मोशेही आई वडिलांबरोबर होता. दहशतवाद्यांनी याठिकाणी घुसताच फायरिंग करत सर्वांना ठार केले होते. 
- पण बेबी मोशेची देखरेख करणारी आया सँड्रा सॅम्युअल नावाची भारतीय महिला मोशेला घेऊन लपली होती. त्यामुळे मोशेचे प्राण वाचले होते.  
- त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सँड्रा आणि मोशेला बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर जगभरातून मोशेला सहानुभुती मिळाली. नंतर सँड्राला इस्रायलची नागरिकता मिळाली होती. 


मोदींनी दिले होते भारतात येण्याचे आमंत्रण 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैमध्ये इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. येरूसलेममध्ये त्यांची मोशेबरोबर भेट झाली होती. त्यावेळी मोदींनी मोशेला विचारले होते, तुला भारतात यायला आवडेल का? तू कुटुंबाबरोबर हवे तेव्हा भारतात येऊ शकतो, तुला हवे तेथे जाता येईल. 
- पंतप्रधानांच्या प्रश्नावर मोशेनेही होकार दिला होता. नंतर नेतन्याहू म्हणाले होते, मोदींनी मला भारतात बोलावले होते. जेव्हा मी जाईल तेव्हा तुला सोबत घेऊन जाईल. 
- मोशे आणि त्याच्या कुटुंबाला भारताने ऑगस्टमध्ये 10 वर्षांचा व्हिसा दिला आहे. या काळात ते कितीही वेळा भारतात येऊ शकतात. 


मी छाबडा हाऊसचा डायरेक्टर बनेल 
मोशे मोदींना म्हणाला होता, माझे आई वडील मुंबईत यहुदी आणि इतरांबरोबर राहत होते. त्यांचे घर सर्वांसाठी खुले असायचे. मी आता इस्रायलमध्ये माझ्या आजोबा आजीबरोबर राहतो. मला मुंबईत जाता येईल अशी आशा आहे. जेव्हा मी म्हातारा होईल तेव्हा आमच्या छाबडा हाऊसचा डायरेक्टर बनेल. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, तेव्हा २ वर्षांचा मोशे आई-वडिलांच्या मृतदेहापाशी रडत होता... 

 

बातम्या आणखी आहेत...