आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीचा प्रवास 10 ते 15 टक्के महागणार, अशी हाेऊ शकते भाडेवाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डिझेलच्या दरात सातत्याने हाेत असलेली वाढ आणि प्रलंबित वेतनाचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने १० ते १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. राज्य परिवहन अायाेगाच्या मंजुरीनंतरच ही भाडेवाढ लागू हाेणार अाहे. एसटी महामंडळाला दरराेज १२ लाख ५०० लिटर डिझेलची गरज भासते. गतवर्षी जुलैच्या तुलनेत यंदा डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत अाहे. गेल्या १० महिन्यांत डिझेलचे दर ८ रुपयांनी महागले. गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात ५४.७४ रुपये असलेला डिझेलचा दर यंदा एप्रिलमध्ये ६३.७८ रुपयांवर गेल्यामुळे महामंडळाला अार्थिक झळ साेसावी लागत अाहे. या दरवाढीमुळे महामंडळाला दरराेज ९७ लाख रुपयांचा ताेटा सहन करावा लागत अाहे.

 
शिवाय, कामगारांच्या महागार्इ भत्त्यात झालेल्या वाढीची झळ महामंडळाला बसली अाहे. २०१४ मध्ये १०७ टक्के असलेला महागार्इ भत्ता यंदा १३६ टक्क्यांपर्यंत गेला अाहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित वेतन करार कामगार दिनापासून (१ मे) लागू करण्याची घाेषणा परिवहनमंत्र्यांनी केली अाहे.  हा वेतनकरार जवळपास अंतिम टप्प्यात असून फक्त घाेषणा करण्याची अाैपचारिकता बाकी अाहे. २२००७-०८ मध्ये १६८ काेटी रुपयांचा नफा कमावणाऱ्या एसटी महामंडळाची सध्याची अार्थिक स्थिती नाजूक असून २०१७-१८ मध्ये महामंडळाला ५४४ काेटी रुपयांचा ताेटा सहन करावा लागला अाहे. तर, संचित ताेटा २ हजार ३०० काेटी रुपयांपर्यंत गेला अाहे. यापूर्वी महामंडळाने ३१ जुलै अाणि २२ अाॅगस्ट २०१४ मध्ये दाेन टप्प्यांत एकूण १४ टक्के भाडेवाढ केली हाेती.  


भाडेवाढीची नेमकी कारणे  
डिझेल दरवाढ, महागार्इ भत्ता, प्रस्तावित वेतन करार या सगळ्या गाेष्टींमुळे एसटी महामंडळाच्या तिजाेरीवर अाणखी माेठा अार्थिक भार पडणार अाहे. डिझेलचा वाढत जाणारा दर, चाकांचे (टायर) दर, कामगारांचा महागार्इ भत्ता अाणि बस सांगाड्याचा दर यावर एसटी महामंडळाची भाडेवाढ ठरते. परिणामी खर्चाचा ताळेबंद बसवण्यासाठी एसटी महामंडळाकडे अाता भाडेवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

अशी हाेऊ शकते भाडेवाढ  
प्रस्तावानुसार १० टक्के भाडेवाढ झाल्यास प्रवासभाडे ३ ते ५० रुपयांपर्यंत वाढू शकते. त्याचप्रमाणे शिवनेरीच्या भाड्यात कमीत कमी १५ रुपये अाणि कमाल ५० रुपयांपर्यंत वाढ हाेऊ शकते. पण भाडेवाढ १५ टक्क्यांपर्यंत झाल्यास प्रवासभाडे अधिक वाढू शकते.

 

बातम्या आणखी आहेत...