आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे. जे हाॅस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईंकाची डाॅक्टरांना मारहाण करुन तोडफोड, डाॅक्टर संपाच्या पवित्र्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शहरातील प्रसिद्ध सर जे.जे. हाॅस्पिटलमध्ये एका पेशंटच्या मृत्युनंतर त्याच्या नातेवाईंकानी दोन निवासी डॉक्टरांना जबर मारहाण केली तसेच हाॅस्पिटलमध्ये तोडफोडही करण्यात आली हा सगळा प्रकार हाॅस्पिटलमधील सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाला असून डाॅक्टर संपाच्या पवित्र्यात असल्याचे समजते. 


हाॅस्पिटल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी सातच्या सुमारास दोन ज्युनिअर निवासी डॉक्टरांना वॉर्ड क्रमांक 11 या सर्जरी वॉर्डमध्येमारहाण करण्यात आली. यात एका डाॅक्टरला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा अॅडमिट करावे लागले त्याच्यावर उपचार सुरु आहेत. जे.जे. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. 

 

आरोपींविरोधात मेडिकेअर कायद्यासोबतच भारतीय दंड विधान कलम 353 आणि 332 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डाॅक्टरांची संघटना मार्डकडून संपाचा पवित्रा घेण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...