आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मॉडेल, अॅंकर आणि होस्ट अंकिता तिवारीची मृत्यूचे रहस्य कायम आहे. अंकिताचा मृत्यू 11 दिवसापूर्वी झाला होता मात्र, पोलिसांचे आजही हात खाली आहेत. अर्पिताच्या नातेवाईकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. दुसरीकडे, अर्पिताच्या मित्रांनी ‘जस्टिस फॉर अर्पिता’ नावाने सोशल मीडियात मोहिम हाती घेतली आहे. यासाठी एक फेसबुक पेज बनविले आहे. पोलिसांना अर्पिताच्या बॉयफ्रेंडसह पाच लोकांवर तिची हत्या केल्याचा संशय आहे. हे ते पाच लोक आहेत जे अर्पिताच्या सोबत त्या फ्लॅटमध्ये होते. या पाचपैकी एक व्यक्ती असाही आहे ज्याने पोलिसांनी माहिती दिली आहे की, त्याने एका आरोपीला अर्पितासोबत आपत्तीजनक स्थितीत पाहिले होते. अर्पिताची अमितशी वाढली होती जवळिक...
- अर्पिताने बॉयफ्रेंड पंकज जाधवचा मित्र अमित हजारे याच्याशी जवळिक वाढवली होती. ते पंकज जाधव याला खटकत होते.
- ज्या रात्री अर्पिताचा संशयास्पद मृत्यू झाला त्या रात्री हे तिघेही एकत्र होते आणि भरपूर दारू पिऊन पार्टी केली होती. यानंतर अर्पितावरून पंकज आणि अमित यांच्यात पहाटे वादावादी झाली होती.
- अर्पिता आणि आपल्या आयुष्यात अमितची एंट्री होत असल्याने सहन न झाल्याने पंकजने तिची हत्या करून तिला बाथरूमच्या खिडकीतून ढकलून दिले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
- अर्पिताची गेल्या काही दिवसांपासून पंकजचा मित्र व त्याता रुममेट असलेल्या अमितशी जवळीक वाढत होती. पंकजला ही जवळीक खटकत असल्याने त्याच्या व अर्पितामध्ये या कारणांवरुन सतत भांडण होत होती.
- त्यामुळे अर्पिता पंकज सोबत नाते तोडण्याच्या तयारीत होती. त्यावरुनच पंकजने अर्पिताची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
- तसेच या हत्येत अमितने देखील पंकजची मदत केल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.
दोन बॉटल विस्की रिचवल्यानंतरही पबमध्ये गेले-
- रविवारी रात्री अर्पिता, पंकज व अमित हे मालाडच्या एका पबमध्ये पार्टी करायला गेले होते. तेथे त्यांनी दोन बॉटल विस्की रिचवली.
- त्यानंतरही ते आणखी एका पबमध्ये गेले. तेथेही दारु प्यायल्यानंतर ते तिघे रात्री अडीचच्या सुमारास पंकज राहत असलेल्या फ्लॅटवर आले.
- त्या फ्लॅटमध्ये पंकज व अमितसोबत आणखी दोन मित्र राहतात. सोमवारी पहाटे देखील त्या दोघांमध्ये अमितवरुन वाद झाला असावा व त्यावेळी रागाच्या भरात पंकजने जड वस्तूने तिच्यावर प्रहार केला.
बाथरुमच्या दाराचे लॅच आतून लॉक केले-
- या हल्ल्यात अर्पिताचा मृत्यू झाल्यानंतर पंकजने अमितच्या मदतीने ही हत्या आत्महत्या आहे असे दाखविण्यासाठी अर्पिताला बाथरुमच्या खिडकीतून खाली फेकले.
- त्यानंतर अमित व पंकजने फार काळजीपूर्वक बाथरुमच्या खिडकीच्या काचा काढल्या व त्यानंतर अर्पिताला खाली फेकून दिले. - त्यानंतर त्यांनी बाथरुमच्या दाराचे लॅच आतून लॉक केले व दरवाजा ओढून घेतला. ज्यामुळे दरवाजा आतून लॉक झाला.
- त्यानंतर ते दोघेही काहीही न झाल्यासारखे वावरत होते. त्या दोघांनी त्यांच्यासोबत घरात राहणाऱ्या दोन मित्रांना अर्पिताने स्वत:ला बाथरुममध्ये बंद करुन घेतल्याचे सांगितले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
स्वयंपाकी कामगाराने जबाब बदलला-
- या प्रकरणात पंकजच्या घरात जेवण बनवायला येणाऱ्या आचाऱ्याने त्याचा जबाब बदलला आहे.
- सुरुवातीला या आचाऱ्याने अर्पिता बाथरुममध्ये गेली तेव्हा पंकज व अमित तिच्या मागे गेले होते.
- पण दरवाजा आतून लॉक असल्याने अमित परत आला होता असे सांगितले होते.
- पण आता या आचाऱ्याने त्याचा जबाब बदलून त्याने काहीही न बघितल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
अर्पिताची बहिण व मित्रांनी केला हा आरोप-
- अर्पिताची बहिणीने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. तिचे म्हणणे आहे की, अर्पिता आणि तिचा बॉयफ्रेंड पंकज जाधव यांच्यात सर्व काही ठीक नव्हते. अर्पिता त्याच्यासोबतचे संबंध तोडू इच्छित होती. पंकज अनेकदा अर्पिताला मारहाण करायचा.
- श्वेताने सांगितले की, पंकज काहीही करत नसे तो अर्पिताच्या पैशावर ऐश करायचा. अर्पिताच्या मृत्यूच्या एक दिवस आधी वडिलांना फोन केला होता व मला सोन्यात गुंतवणूक करायची आहे अशी म्हणाली. याचाच अर्थ ती जीवनात पुढे जाऊ इच्छित होती. तसेच भविष्याबाबत ती विचार करत होती याचा अर्थ ती आत्महत्या करू शकत नाही.
- अर्पिताचा मित्र लकी शर्माच्या माहितीनुसार, हे कसे शक्य आहे की एका फ्लॅटमध्ये पाच लोक उपस्थित आहेत आणि त्यांना याची साधी भनक लागत नाही? अखेर पोलिस त्या लोकांकडे सक्त चौकशी का करत नाहीत. हा प्रकार आत्महत्येचा नव्हे हत्येचा आहे.
- त्या फ्लॅटमध्ये त्या रात्री तीनच गोष्टी घडू शकतात ते म्हणजे अर्पितासोबत जबरदस्ती झाली असावी, किंवा तिने स्वत:ला वाचविण्यासाठी वरून उडी मारली असावी किंवा तिला फेकून दिले असावे.
या स्थितीत मिळाली अर्पिताची बॉडी-
- मालवणी पोलिसांच्या माहितीनुसार, अर्पिता मीरा रोड भागात राहत होती. तसेच तिची बॉडी मानव तल बिल्डिंगमधील दुस-या मजल्यावरील टेरेसवर अंडर गारमेंट्समध्ये मिळाली होती.
- ती सोमवारी आपल्या बॉयफ्रेंडसोबत मालवणीतील कच्चा रास्ता स्थित मानव तल बिल्डिंगमधील15 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये गेली होती. तेथे एक पार्टी सुरू होती.
मित्रांनी पोलिसांना सांगितली ही कहाणी-
- अर्पिताच्या सहका-यांनी सांगितले की, पहाटे चारपर्यंत आमची पार्टी चालली त्यानंतर आम्ही झोपलो. मात्र, सकाळी उठलो तेव्हा अर्पिता फ्लॅटमधून गायब होती.
- अर्पिता आपला मित्र पंकज जाधवसोबत मानवस्थल बिल्डिंगमध्ये आली होती. 15 व्या मजल्यावरील 1501 नंबरच्या फ्लॅटमध्ये पार्टी सुरू होती. पंकज आणि अर्पिता पहाटे चार वाजेपर्यंत पार्टी करत होते. सकाळी नऊ वाजता उठलो तेव्हा अर्पिता तेथे नव्हती.
- तिला शोधले असता समजले की, बाथरुमचा दरवाजा बंद आहे. जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा तेथील काच तोडलेली दिसली. खाली येऊन पाहिले तर दुस-या मजल्यावर अर्पिताचा मृतदेह पडला होता.
शरीरावरील जखमामुळे वाढला संशय-
- अर्पिताच्या मृत्यूनंतर प्रिलिमनरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार, तिच्यावर कोणतेही जबरदस्ती झालेली नाही. मात्र, मृत्यू मल्टीपल इन्जूरीमुळे झाल्याचे अहवाल सांगतो.
- ही इन्जूरी कोणत्याही प्रकारची असू शकते. उडी मारल्याने किंवा तिला फेकून दिल्याने. अर्पिताच्या मानेवर आणि शरीराच्या अनेक भागावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अर्पिताचे आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.