आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यकथा: तीन वर्ष आपल्या पत्नीच्या थडग्यावर नाचत होती ही व्यक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ती खुपच सुंदर होती. म्हैसुर राजघराण्याच्या दिवाणजींची ती मुलगी होती. तिच्या चाहत्यांची संख्या खूपच मोठी होती. पण तिचे प्रेम एका अशा व्यक्तीवर जडले होते जी व्यक्ती तिच्या प्रेमाची प्रतारणा करणार होती. ती व्यक्ती तिच्या मृत्यूनंतर 3 वर्ष तिच्या थडग्यावर नाचत होती. ही एक सत्यकथा आहे. या खून प्रकरणाला डान्सिंग ऑन ग्रेव असेही म्हटले जाते. 

 

 

शाकिरा नमाजी खलीली यांचे खून प्रकरण
म्हैसूर राजघराण्याच्या दिवाणजीची शकिरा नमाजी खलीली ही मुलगी होती. तिचे रिटायर आयएफएस अधिकारी आणि ऑस्ट्रेलियाचे हाय कमिशनर अकबर मिर्जा खलीली यांच्यासोबत लग्न झाले. सगळे काही सुरळित चालले होते. त्यांना 4 मुली झाल्या. अशी 25 वर्षे निघुन गेली. याच काळात शकिराच्या जीवनात आणखी एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीचे नाव होते मुरली मनोहर मिश्र. मुरली हे एका राजघराण्यात नोकर होते. त्यांची एका कार्यक्रमात शकिरासोबत ओळख झाली होती. या ओळखीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले.  

 

 

सबा करु लागली मुंबईत मॉडेलिंग

करव्यवस्था आणि मालमत्तांच्या व्यवहाराची मिश्र यांना चांगली माहिती होती. ते काही काळाने स्वामी श्रद्धानंद असे नाव त्यांनी धारण केले. इकडे शकिराला मुलगा असावा असावे असे वाटत होते. त्यामुळे तिने स्वामींची भेट घेतली. काही काळानंतर त्यांच्यातील जवळीक खूपच वाढली. तिने आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि मिश्र सोबत विवाह केला. त्यानंतर ते बंगळुरु येथे स्थलांतरित झाले. तिचे हे वर्तन तिच्या मुलींना आवडले नव्हते. त्या आईपासून दुर गेल्या. पण सबा ही चौथी मुलगी आईसोबत होती. सबा मुंबईत राहुन मॉडेलिंग करत होती. 

 

 

5 वर्षांनंतर घडले असे
शकिराच्या दुसऱ्या लग्नानंतर 5 वर्ष सर्वकाही सुरळित सुरु होते. पण दिवस अचानक शकिरा गायब झाली. सबाने मुंबईतुन आईला व स्वामीला कॉल केला. तर तिला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ती कर्नाटकात गेली. तिथे तिने आईचा 9 महिने शोध घेतला. एक स्वामीने तिला तिची आई अमेरिकेत असल्याचे सांगितले. ती गर्भवती असून रूजवेल्ट हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे सांगितले. पण सबाने माहिती काढली असता शाकिरा खलीली नावाची कोणतीही महिला तिचे दाखल नव्हती. सबाला शंका आल्याने तिने पोलिसांकडे फिर्याद दिली. 

 

 

असा केला शकिराचा खून

नोकराच्या जबाबावरुन पोलिसांनी स्वामीला ताब्यात घेतल्यावर त्याने सत्य सांगितले. त्याने शकिराच्या संपत्तीसाठीच तिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले होते. पण शकिरा आपल्या मुलींना आपली सगळी संपत्ती देणार असल्याचे समजले. त्यानंतर त्याने 28 एप्रिल 1991 रोजी तिच्या चहात बेशुध्द पडण्याचे औषध मिसळले. त्यादिवशी त्याने सगळ्या नोकरांना सुट्टीही दिली होती. शकिरा बेशुध्द होताच तिला एका गादीत गुंडाळून ताबुतमध्ये टाकले आणि तिचे दफन केले. तिला त्याने आपल्या अंगणातच गाडले होते. त्यावर त्याने टाइल्सही टाकल्या होत्या. तिच्या या थडग्यावर तो रोज पार्टी करत होता. दारु पिऊन नाचत होता. 

 

 

ताबूतमधून बाहेर पडण्याचा शकिराने केला प्रयत्न
ताबूतमध्ये असताना शकिराने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण ती बाहेर पडू शकली नाही व तिचा मृत्यू झाला. ताबूतच्या आता तिने त्याला ओरखडल्याच्या खूणा आहेत. ताबूतमध्ये असलेल्या अंगठ्या आणि बांगड्यांवरुन तिची ओळख पडली. सुप्रीम कोर्टाने स्वामीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तो आता कर्नाटकातील बेळगाव जेलमध्ये आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...