आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमला मिल दुर्घटनेत अायुक्त दाेषी; सीबीअाय चाैकशी करा-संजय निरुपम यांचा अाराेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कमला मिल अाग दुर्घटनेनंतर चाैकशी सुरू झाली. मात्र, यात काळेबेरे दडले असून  त्यात  अायुक्त दाेषी अाहेत, असा अाराेप करत या  प्रकरणाची सीबीअाय व न्यायालयीन चाैकशी करावी. जाेपर्यंत चाैकशी हाेत नाही ताेपर्यंत अायुक्तांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी मुंबर्इ काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी साेमवारी केली. तसेच दबाव टाकणाऱ्या नेत्याचे नाव अायुक्तांनी उघड करावे, असे अावाहनही त्यांनी केले.  


मुंबर्इ महानगरपालिकेमध्ये खालच्या स्तरापासून उच्चस्तरापर्यंत भ्रष्टाचार अाहे. कमला मिल प्रकरणाला संपूर्ण महानगरपालिका अाणि अजाेय मेहताच जबाबदार अाहेत. पालिका अायुक्तच या घाेटाळ्यात सहभागी असल्यामुळे त्यांनी  प्रकरणाची चाैकशी करू नये. मेहता यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी निरुपम यांनी केली. कमला मिल अाग दुर्घटनेची तातडीने सीबीअाय किंवा न्यायालयीन चाैकशी करण्याची मागणी करूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष करत महापालिका अायुक्तांनाच चाैकशीसाठी नेमले. त्यानंतर कारवार्इचा फार्स करण्यात अाला. परंतु अाता कमला मिल येथे स्मॅश गेमिंग सेंटर सुरू झाले असून त्यातील बांधकाम अनधिकृत असतानाही  अायुक्तांसह दाेन अधिकाऱ्यांनी सही करून पाच दिवसांत परवानगी दिल्याचे निरुपम यांनी प्रसार माध्यमांना पुराव्यासह दाखवले. या गेमिंग सेंटरमध्ये रेसिंग ट्रॅकला परवानगी नसतानाही ते ट्रॅक बांधण्यात अाले. त्यानंतर अायुक्तांनीच परवानगी देऊन ते नियमित केल्याचा दावा निरुपम यांनी केला. स्मॅश गेमिंग ट्रॅक प्रकरणात आयुक्तांसह मोठ्या पदावरील अभियंते सहभागी अाहेत,असेही ते म्हणाले. 


नेत्याचे नाव जाहीर करा  
एका राजकीय नेत्याने फाेन करून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांचे निलंबन का केले? असेदेखील या नेत्याकडून विचारण्यात अाले. त्यामुळे अायुक्तांनी त्या नेत्याचे नाव  जाहीर करावे, हा नेता काेण हे जनतेला कळले पाहिजे, असे अावाहन निरुपम यांनी केले. 

 

मोजोचे पाच संचालक नागपूरचे   
माेजाेस पबवर सरकारला कारवार्इ करायची नव्हती. अग्निशमन विभागाचा अहवाल नऊ दिवसांनी अाल्यानंतर कारवार्इ झाली. या कारवार्इतही एकाच मालकाला अटक करण्यात अाली, पण बाकीच्या मालकांना वाचवले जात अाहे. कारण माेजाे पबच्या सहा संचालकांपैकी पाच संचालक नागपूरचे अाहेत. नागपूर अाणि भाजप कनेक्शनमुळेच त्यांना पकडण्यासाठी टाळाटाळ हाेत असल्याचा अाराेप निरुपम यांनी केला. माेजाे पबसारखे रेस्टाॅरंट सुरू करण्याचा प्रस्ताव घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे गेले. २०१६ च्या अखेरीस  नागपूर येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून त्यांना अभय देण्यात अाले. त्यामुळेच माेजाेला वाचवण्याचा प्रयत्न सुरू अाहे.  

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...