आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीडीआर प्रकरणात आता अभिनेत्री कंगना आणि जॅकी श्रॉफच्या पत्नीचे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बेकायदेशीरपणे कॉलचा तपशील (सीडीआर) मिळवल्याप्रकरणी आता अभिनेत्री कंगना रनौत आणि जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफचे नाव समोर येत आहे. पोलिसांच्या मते, दोन वर्षांपूर्वी कंगनाने अभिनेता हृतिक रोशनचा मोबाइल क्रमांक वकिलाला दिला होता. त्या क्रमांकाच्या कॉलचे तपशील तिने मिळवल्याचा आरोप आहे. तर, आयेशाने अभिनेता साहिल खानचे कॉल रेकॉर्ड मिळवले होते. त्यांना चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आले आहेत. 


दरम्यान, सीडीआर प्रकरणात अटकेत असलेले वकील रिझवान सिद्दिकी यांच्या सुटकेचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अभिनेता नवाजुद्दीनच्या पत्नीच्या कॉल डाटा रेकॉर्डप्रकरणी रिझवान सिद्दिकी यांना १६ मार्च रोजी अटक झाली होती. मात्र, कोणतीही नोटीस न देता आपल्या पतीला अटक करण्यात आली असून हे बेकायदा असल्याचा दावा रिझवान सिद्दिकी यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात केला होता. सीडीआरप्रकरणी १० मार्च रोजी सिद्दिकी दांपत्यास ठाण्याच्या गुन्हे शाखेत बोलावण्यात आले होते. तत्पूर्वी, सिद्दिकी यांनी नवाजुद्दीनच्या पत्नीचे सीडीआर खासगी हेराकडून मिळवले होते, असे या प्रकरणी आधीपासून अटकेत असलेल्या काही लोकांनी पोलिसांना सांगितले होते. दरम्यान, नवाजुद्दीन यांचा या प्रकरणाशी थेट काहीच संबंध नसल्याच्या दावा ठाण्याचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे. नवाजुद्दीनला साक्षीदाराच्या रूपात ठाण्यात बोलावण्यात आले होते आणि त्याने सहकार्यही केल्याचे सिंग यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...