आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक समुद्र दिन: विस्मयकारक नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे महाराष्ट्रातील समुद्रकिनारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कोकणाला महाराष्ट्रातील 720 किलोमीटरची अरुंद अशी किनारपट्टी लाभली आहे. पश्चिमेस अरबी समुद्र तर, पूर्वेला समांतर अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. येथील जैवविविधता, परंपरा, पाककृती आणि भाषांमध्ये कोकणाचे वेगळेपण आहे. उत्तरेकडील बोर्डीपासून ते दक्षिणेकडील शिरोडा पर्यंत पसरलेला कोकणचा महाराष्ट्रातील समुद्रकिनारा विस्मयकारक नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. आज जागतिक समुद्र दिन आहे या निमित्ताने पाहुया कोकणातील सुंदर समुद्र किनारे..


किना-यावर वसलेली सुंदर शहरं..
कोकणातील किनाऱ्यावर वसलेली रत्नागिरी– गणपतीपुळेसारखी सुंदर शहरेदेखील येथे पाहायला मिळतील. तुम्हाला जर, छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखालील मराठा साम्राज्याची शक्ती तुम्हाला अनुभवायची असेल, तर मालवणच्या किनाऱ्यावर उभा असणारा सिंधुदुर्ग किल्ला पाहाच. साहसी खेळांची आवड असणा-यांसाठी सिंधुदुर्गात स्नॉर्कलिंग- स्कुबा डायव्हिंगसारख्या संधी उपलब्ध आहेत.


कोकणातील समुद्र किनारे तुम्‍हाला फिरायचे असतील तर, रत्नागिरी हे तळ ठोकण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. हापूस आंबे, नारळ, फणस आणि 15 व्या् शतकातील किल्याची पार्श्वभूमी असलेले वाळूचे सागरी किनारे यासाठी हे बंदराचे शहर प्रसिद्ध आहे.

 

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहू, महाराष्ट्रातील असेच काही सुंदर समुद्र किनारे..

 

बातम्या आणखी आहेत...