आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमाप्रकरणी द्विसदस्यीय समिती नेमणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काेरेगाव भीमा येथील हिंसाचाराची चौकशी  करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेतील द्विसदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक हे या समितीचे सदस्य असतील.  या समितीला चौकशीसाठी ४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.


कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनांचा क्रम आणि त्यासाठी कारणीभूत असलेली परिस्थिती याची कारणमिमांसा करणे हे समितीचे प्रमुख काम असेल.  ही घटना घडविण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट किंवा संघटना कारणीभूत होत्या काय, परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि पोलिस यंत्रणेने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले नियोजन व तयारी पुरेशी होती काय, पोलिसांकडून योग्य कारवाई झाली होती का याबाबतही समितीकडून चाैकशी केली जाईल.  तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व पोलिसांनी करावयाच्या तत्कालिक आणि कायमस्वरूपी उपाययोजना सुचविणे, व अन्य इतर महत्त्वाच्या शिफारसी करण्याचे अधिकार  समितीला राहतील.

बातम्या आणखी आहेत...