आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: ललितावर आज लिंगबदलाची शस्त्रक्रिया, ललितकुमार होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे - Divya Marathi
महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे

मुंबई- बीड पोलिस दलात कार्यरत असलेली महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे हिच्यावर लिंगबदलाची पहिली शस्त्रक्रिया शुक्रवारी मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालयात ही शस्त्रक्रिया होत असून, पहिल्या टप्प्यात ललिताचे स्तन, गर्भाशय, अंडाशय काढून टाकले जाणार आहे. ललिता साळवे हिच्यावर एकून चार ते पाच शस्त्रक्रिया     कराव्या लागणार आहेत. या सर्व शस्त्रक्रियेसाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. दुसरी शस्त्रक्रिया सहा महिन्यांनी होणार आहे. 

 

ललिता साळवेला नुकतीच राज्य सरकारने लिंगबदलास परवानगी दिली आहे. यानंतर ललिता मुंबईतील रूग्णालयात तत्काळ दाखल झाली. त्यानुसार मागील दोन दिवसात तिच्या विविध प्रकारच्या तपासण्या व चाचण्या घेण्यात आल्या. यात रक्तचाचणी, हिमोग्लोबीन व रक्ताच्या अन्य चाचण्या, एक्स-रे, ईसीजी आणि जेनेटिक आदींसह शारीरिक व मानसिक चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ललिता फिट आढळली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास काहीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर लागलीच लिंगबदलातील पहिली शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सेंट जॉर्ज रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी स्पष्ट केले.

 

सेंट जॉर्ज रुग्णालयातील स्टिक सर्जरी विभागाचे डॉ. रजत कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम ललितावर शस्त्रक्रिया करणार आहे. ललिता गरीब कुटुंबांतील आहे त्यामुळे तिला शस्त्रक्रियेचा आर्थिक भार पेलवणार नाही त्यामुळे ललिताचे आई-वडिल व रुग्णालय प्रशासन हे दानशूर व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पैसे जमा करत असल्याचेही कपूर यांनी सांगितले.

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, ललिता साळवेविषयी आणखी काही माहिती.....

 

बातम्या आणखी आहेत...