आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर: हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, निरस ठरलं यंदाचं अधिवेशन, पाहा फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पहिल्या दिवसापासून अतिशय निरस ठरलेलं यंदाचं नागपूरमधील विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाचं सूप अखेर शुक्रवारी वाजलं. सत्ताधारी अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच सिंचन घोटाळ्यावरून गुन्हे दाखल केल्याने विरोधकांचा आवाज तसा बसलेलाच राहिला. दोन आठवड्यातील जेमतेम 10 दिवस हे अधिवेशन चाललं. यात काही महत्त्वाचे तर काही अनपेक्षित निर्णय घेतले. जसं शाळांचं खासगीकरण. या अधिवेशनादरम्यान गुजरात-हिमाचलचे निकाल आले. अधिवेशनाच्या दुस-या दिवशी शरद पवार यांनी शेतक-यांचा आक्रोश मोर्चा काढला व तो दिवस सोडला तो मोर्चा झाळोकून गेला.

 

गुरूवारी जयंत पाटील यांनी धनगर वेषात विधीमंडळात प्रवेश करत सरकारला धनगर आरक्षणाची आठवण करून दिली. शेवटच्या दिवशी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा कॅबिनेटने निर्णय घेतला असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली. सत्ताधारी आमदार व पक्षात नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला धारेवर धरल्याचे या अधिवेशनात दिसून आले. काटोलचे भाजपचे आमदार आशिष देशमुख संघाच्या बौद्धिकाला दांडी मारून विरोधी पक्षातील नेते अजित पवारांसोबत हास्यविनोदात रमलेले दिसले.

 

पुढे स्लाईडद्वारे फोटोमधून पाहा, आजच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस कसा होता....

बातम्या आणखी आहेत...