आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक : काँग्रेसच्या माणिकरावांचा पत्ता कट, शरद रणपिसेंना संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- १६ जुलै राेजी हाेणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दाेघांची उमेदवारी जाहीर करण्यात अाली. त्यात मावळते अामदार शरद रणपिसे यांना पुन्हा संधी देण्यात अाली, तर विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा मात्र पत्ता कट करण्यात अाला. त्यांच्याच यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मिर्झा वझाहत यांना उमेदवारी देण्यात अाली. 


काँग्रेसचे ४ विधान परिषद सदस्य निवृत्त हाेत अाहेत, मात्र त्यांचे फक्त दाेनच उमेदवार निवडून येऊ शकतात. दरम्यान, शिवसेनेतर्फे मावळते अामदार अनिल परब यांच्यासाेबत मनीषा कायंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याची पक्षात चर्चा सुरू अाहे. 

बातम्या आणखी आहेत...