आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राज्यातील विधान परिषदेच्या सहा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात आज मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या समविचारी पक्षांनी आघाडी केली आहे तर भाजप-शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवताना दिसत आहेत. असे असले तरी या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस फायद्यात असल्याचे दिसत आहे. भाजपच्या अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली तर राष्ट्रवादीच्या कोकण आणि नाशिक या प्रत्येकी दोन-दोन जागा सेफ असल्याचे दिसून येत आहे तर बीड- लातूर- उस्मानाबाद स्थानिक मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादीत काँटे की टक्कर होताना दिसत आहे. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत शिवसेनेचे पारडे काहीसे जड वाटत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस खातेही खोलू शकणार नाही असे बोलले जात आहे.
काय आहे स्थिती-
कोकण मतदारसंघ-
या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीत थेट लढत होत आहे. शिवसेनेकडून राजीव साबळे तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे रिंगणात आहेत. मात्र, या मतदारसंघात निर्णायक 97 मते असलेल्या नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने अनिकेत तटकरेंना पाठिंबा दिला आहे. सोबतच, भाजपने येथेही शिवसेनेला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्याने भाजपची मते राष्ट्रवादीच्याच पारड्यात पडणार असल्याचे उघड आहे. त्यामुळे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांचा विजय निश्चित मानला जातोय.
कोकणात असे आहे पक्षीय बलाबल-
विधानपरिषदेत या मतदारसंघात एकूण 941 प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
सध्य स्थितीत शिवसेनेकडे 293 तर भाजपकडे 164 मते आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे 174 तर, काँग्रेसकडे 69 मते आहेत. नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाकडे 97 मते आहेत. मनसेकडे 25 मते, आरपीआय 28, शेकाप 39 व इतर असे एकून 92 असे मतदार आहेत. स्वाभिमानसह मनसे व शेकापने अनिकेत तटकरेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मोठ्या फरकाने विजय मिळवेल असे मानले जात आहे.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, परभणी-हिंगोलीत कोण जिंकणार?....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.