आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी- भाजप 5 जागा जिंकणार; परभणीसाठी काँग्रेस- शिवसेनेत चुरस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील सहा स्थानिक स्वराज संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. सहा जागांवर भरभरून मतदान झाले. नाशिकमध्ये 100 टक्के तर उर्वरित पाच ठिकाणी 99 टक्केहून अधिक मतदान झाले. दरम्यान, या निवडणुकीत झालेल्या मतदानानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला तीनही जागा जिंकण्याची संधी आहे. तसेच भाजप दोन जागा राखणार आहे. परभणी-हिंगोलीच्या एका जागेसाठी शिवसेना व काँग्रेसमध्ये मोठी चुरस आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाशिक व कोकणची जागा निश्चित जिंकणार असे मानले जात आहे तर भाजप अमरावती व वर्ध्याची जागा आपल्या खिशात घालणार आहे. उस्मानाबाद-लातूर-बीडसाठी भाजप-राष्ट्रवादीत मोठा संघर्ष आहे. मात्र, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन केल्याने ही जागाही राष्ट्रवादी मारेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सुरेश धस यांनी आपण ही जागा 150 हून अधिक मतांनी जिंकणार असा दावा केल्याने पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना धोबीपछाड देणार का याकडे लक्ष आहे.

 

परभणी- हिंगोलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्याने स्वाभाविकच काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांना संधी असल्याचे मानले जात आहे. मात्र, अकोल्यातून आयात केलेले शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे चिरंजीव विप्लव बाजोरिया यांनीही पैशांची पेरणी करत मतांची जुळवाजुळव केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे परभणी-हिंगोलीत शिवसेना व काँग्रेसमध्ये चुरस आहे. भाजपने येथे शिवसेनेच्या बाजोरिया यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या नेतेमंडळींनी बाजोरिया यांच्यासाठी मतदारांची जुळवाजुळव करताना शिवसेना, भाजपसह अपक्ष व स्थानिक आघाडीच्या मतदारांना सर्वार्थाने सोबत घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना जिंकेल असे शिवसेनेचे म्हणणे आहे. 

 

कोणत्या ठिकाणी किती झाले मतदान-

 

- नाशिकमध्ये 100 टक्के
- परभणी-हिंगोलीत 501 पैकी 499 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 
- अमरावती मतदारसंघात 489 पैकी 488 जणांनी मतदान केले. मतदानांची टक्केवारी 99.80 टक्के इतकी राहिली.
- उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद मतदारसंघासाठी 99.72 टक्के मतदान झाले. 1005 पैकी 1004 जणांनी मतदान केले.
- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघात आज निवडणुकीत 99.27 टक्के मतदान
- कोकण मतदारसंघात 98 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे. 

 

सहा ठिकाणी असे आहे पक्षीय बलाबल-

 

1) कोकण मतदारसंघ- अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) विरुद्ध राजीव साबळे (शिवसेना)

 

एकूण मतदार 941 

 

शिवसेना  293
भाजपा  164
राष्ट्रवादी  174
काँग्रेस 69
शेकाप 92
स्वाभिमान 98
आरपीआय 24
मनसे 12
अपक्ष आणि ग्रा.विकास आ. 13

 

2) नाशिक मतदारसंघ- नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)

 

एकूण 644 मतदार

 

भाजप - 167
शिवसेना - 207
राष्ट्रवादी काँग्रेस- 100
काँग्रेस - 71
मनसे - 6
आरपीआय- 5
अपक्ष - 38
इतर- 50

 

3) परभणी-हिंगोली मतदारसंघ- विप्लव बजोरिया (शिवसेना) विरुद्ध सुरेश देशमुख (काँग्रेस)

 

एकूण 501 मतदार

 

राष्ट्रवादी 162
काँग्रेस 135
भाजप 51
शिवसेना 97
रासप 7
मनसे 5
एमआयएम 1
अपक्ष 43

 

4) उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघ- सुरेश धस (भाजप) विरुद्ध अशोक जगदाळे (अपक्ष)- राष्ट्रवादीचा पाठिंबा

 

एकूण 1006 मतदार

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 527
भाजप - 321
शिवसेना - 64
अपक्ष - 94

 

5) अमरावती मतदारसंघ -  प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध अनिल मधोगरिया (काँग्रेस)

 

एकूण 489 मतदार

 

भाजपा - 200
काँग्रेस - 128
राष्ट्रवादी - 40
शिवसेना - 28
प्रहार - 18
एमआयएम - 14
युवा स्वाभिमान पार्टी - 13
बसपा - 6
अपक्ष - 33
रिपाई - 4
सपा - 1
मनसे - 2
लढा - 1
स्वाभिमानी शे.सं. - 1

 

6) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघ- इंद्रकुमार सराफ (काँग्रेस)  विरुद्ध रामदास अंबटकर (भाजप)

 

एकूण मतदार संख्या - 1049

 

भाजपा -  495
शेतकरी संघटना -  53
काँग्रेस -  260
राष्ट्रवादी काँग्रेस -  79
बहुजन समाज पार्टी - 18
मनसे - 2
सीपीआय - 2
इतर - 15
अपक्ष - 54.

बातम्या आणखी आहेत...