आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: 19 वर्षीय तरूणीने ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबलं, कारने 6 जणांना उडवले!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत गर्दीचा परिसर अशी ओळख असलेल्या धारावी भागात एका 19 वर्षीय तरूणीने कारचा ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सीलेटर दाबल्याने 6 लोकांना उडवले. दरम्यान, पोलिसांनी संबंधित तरूणीला अटक केली आहे. ध्रुवी जैन असे या तरूणीचे नाव असून, तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

 

याबाबतची माहिती अशी की, 19 वर्षीय ध्रुवी जैन सध्या लॉच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. दोन दिवसापूर्वी धारावी परिसरातून ध्रुवी जैन आपल्या तीन मैत्रिणींसह कारने बांद्र्याला चालली होती. ध्रुवीने ही कार भाड्याने घेतल्याचे कळते. मात्र, सिग्नल लागल्याने कारचा वेग कमी करण्यासाठी ब्रेकऐवजी ध्रुवीने अॅक्सीलेटर दाबला. त्यामुळे समोर थांबलेल्या काही गाड्यांना उडवत ध्रुवीची कार वेगाने उडाली. यात जीवितहानी झाली नाही मात्र सहा जण जखमी झाले. यात एका लहान मुलीचा समावेश आहे.

 

या घटनेनंतर पोलिसांनी ध्रुवीला ताब्यात घेतले. ध्रुवीने आपली चूक मान्य केली व ब्रेकऐवजी अॅक्सिलेटरवर आपला पाय पडल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी तिच्यावर निष्काळजीपणे वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल केला व कोर्टात हजर केले. कोर्टाने तिला जामीन मंजूर केला. 

 

बातम्या आणखी आहेत...