आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात लोकलच्या डब्याला आग; मोठी दुर्घटना टळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या सायडिंगला जाणाऱ्या लोकलला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात 2010-बी हा डबा जळून खाक झाला आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळं लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग लागली तेव्हा लोकलमध्ये कुणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, या दुर्घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...