आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचा मुंबईत एकत्र योगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आज जगभर आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होत आहे. यानिमित्त मुंबईतील बांद्रा रिक्लेमेशन सीलिंक आज सकाळी आयोजित योगदिनाच्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी योगा केला. 

 

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2018 च्या या कार्यक्रमाला मुंबई महापालिकेचे व मुंबई पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजेय मेहता आणि मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर हे सुद्धा उपस्थित होते. 

 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, योग ही आपल्या देशातील प्राचीन चिकित्सा पद्धती असून आधुनिक जीवनशैलीमुळे होणाऱ्या वाईट परिणामांना तोंड देण्यासाठी आज तो आवश्यक आणि सर्वोत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर आणि मन सुदृढ होते आणि म्हणूनच त्याला लोकमान्यता प्राप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव दिला आणि आज 175 राष्ट्र, भारताचा प्राचीन वारसा असलेला हा दिवस साजरा करीत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...