आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येताच DGP अॅक्‍शनमध्‍ये, धुळ्यातील घटनेवरून दिले हे कठोर आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्‍याचे नवे पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर यांनी 30 जून रोजी आपला पदभार स्‍वीकारला. त्‍याच्‍या एकाच दिवसानंतर धुळ्यामध्‍ये केवळ अफवेवरून जमावाने 5 जणांची निर्घृण हत्‍या केली. याप्रकरणी 23 जणांना अटकही करण्‍यात आली आहे. जूनमध्‍ये केवळ अफवेवरून जमावाने केलेल्‍या मारहाणीत महाराष्‍ट्रात 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. याची गंभीर दखल घेत पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर यांनी अफवा पसरवणा-यांना गंभीर इशारा दिला आहे. 


काय म्‍हणाले नवे पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर?
अफवेमुळे होणारे हत्‍यांचे सत्र थांबवण्‍यासाठी पोलिस महासंचालकांनी जनतेला आवाहन केले आहे की, 'अशा प्रकारच्‍या काही घटना तुमच्‍या निदर्शनास आल्‍यास ताबडतोब याची माहिती पोलिसांना कळवा. कृपया व्‍हॉट्स अप तसेच सोशल मिडीयावरील अफवांवर विश्‍वास ठेवू नका. तसेच त्‍यांना शेअरही करू नका. असे करताना कोणी आढळले तर त्‍याच्‍यावर कठोर कारवाई केली जाईल.'


दिव्य मराठी अावाहन: सजग राहा, पण कायदा हाती घेऊ नका
काही ‘उत्साही’ लाेक अापल्याकडे अालेला मेसेज फक्त गावाचे नाव बदलून पुढे पाठवत अाहेत. यातून गैरसमज पसरून हिंसक पडसाद उमटत अाहेत. देशभरातील दहा राज्यांत हिंसक जमावाने पाेरधरी समजून ३० जणांचे बळी घेतले. महाराष्ट्रात ही संख्या सर्वाधिक ८ झाली अाहे. समाजात घडणाऱ्या अशा घटनांबाबत जागरुक राहणे हे प्रत्येक नागरिकाचेच कर्तव्य अाहे. मात्र गैरसमजातून कायदा हाती घेऊन एखाद्याच्या जीव घेण्याचा अधिकार काेणालाच नाही. त्यामुळे सर्वांनाच नम्र अावाहन अाहे की, साेशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा. कुठल्याही अफवांना बळी पडू नका, त्याची खातरजमा करून घ्या. समाजात काही चुकीचे घडत असेल किंवा अशा दुष्प्रवृत्तीच्या व्यक्ती अाढळून आल्या तर त्यांना पकडून पाेलिसांच्या स्वाधीन करा, स्वत: कायदा हातात घेऊ नका.
 

 

बातम्या आणखी आहेत...