आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOVT JOBS: खुशखबर..राज्‍यात महानोकरभरती, 36000 पदांसाठी महिन्‍याभरात येईल जाहिरात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्‍य शासनाच्‍या विविध विभागांतील तसेच निमशासकीय कार्यालयांतील रिक्‍त पदे भरण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. त्‍यामुळे राज्‍यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्‍या संधी मिळणार आहेत. या महिनाअखेर राज्‍यातील सर्वच विभागील रिक्‍त पदांची जाहिरात निघणार आहे. यानूसार 36000 पदांची भरती करण्‍यात येणार आहे. महिन्याभरात नोकरभरतीची जाहिरात काढण्यात येणार आहे.


मार्च-एप्रिलमध्ये पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या सेवेतील एकूण रिक्त जागांपैकी 72 हजार पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 36 हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 17 जुलैला राज्‍यातील सर्व विभागांना रिक्‍त पदाची माहिती देण्‍याचे निर्देश राज्‍य सरकारने दिले आहे. त्‍यानंतर 31 जुलैला पदांची जाहिरात निघणार आहे. ऑगस्‍टमध्‍ये जिल्‍हा निवड समित्‍यांच्‍या समन्‍वयातून नियोजन करून एकाच दिवशी परीक्षा घेण्‍यात येणार आहे.


पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार जागा खालीलप्रमाणे -
1) ग्रामविकास विभाग - 11 हजार 5 पदे
2) सार्वजनिक आरोग्य विभाग- 10 हजार 568 पदे
3) गृह विभाग- 7 हजार 111 पदे
4) कृषी विभाग- 2 हजार 572 पदे
5) पशुसंवर्धन विभाग- 1 हजार 47 पदे
6) सार्वजनिक बांधकाम विभाग- 837 पदे
7) जलसंपदा विभाग- 827 पदे
8) जलसंधारण विभाग- 423 पदे
9) मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90
10) नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे

बातम्या आणखी आहेत...