Home »Maharashtra »Mumbai» Maharashtra Government Ordered Colleges To Distribute Bhagwad Gita

आता महाविद्यालयांमध्‍ये होणार भगवत गीतेचे वाटप, राज्‍य सरकारचा निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना आपल्‍या महाविद्यालयात भगवत गीतेचे वाटप करण्‍याचे आदेश.

प्रतिनिधी | Jul 12, 2018, 14:50 PM IST

मुंबई - मुंबई शहर व उपनगरातील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना आपल्‍या महाविद्यालयात भगवत गीतेचे वाटप करण्‍याचे आदेश राज्‍य सरकारने दिले आहे. राज्‍य शासनाच्‍या उच्‍च शिक्षण, मुंबई विभागातर्फे तसे पत्र या महाविद्यालयांना आज बुधवारी देण्‍यात आले.


हे पत्र शहर व उपनगरातील सर्व अशासकीय अनुदानित कला, वाणिज्‍य, विज्ञान, शिक्षणशास्‍त्र व विधी महाविद्यालये यांच्‍या नावाने देण्‍यात आले आहे. यानूसार नॅक मुल्‍यांकित अ/अ+ प्राप्‍त श्रेणी महाविद्यालयांना 100 भगवत गीतेचे संच वाटप करण्‍यास सांगितले आहे. त्‍यासाठी या सर्व महाविद्यालयांनी मुंबई विभागाच्‍या उच्‍च शिक्षण, सहसंचालक कार्यालयातून भगवत गीतेचे संच घेऊन जावे व त्‍याचे वाटप केल्‍यानंतर त्‍याची पावती सादर करावी, असे आदेश देण्‍यात आले आहेत.

पुढील स्‍लाइडवर वाचा, उच्‍च शिक्षण विभागाचे पत्र...

Next Article

Recommended